Wednesday, March 04, 2026
२८ फेब्रुवारी २०२६
आज स्वच्छ हवा. वसंत ऋतूची सुरवात होण्याची चिन्हे आजच्या हवेत होती. मागच्या आठवड्यात पडलेला स्नो अजूनही वितळतोय. आज दुपारी एका उपाहारगृहात पण बरेच दिवसांनी गेलो. सा ऊथ इंडियन थाळी छान असते तिथली. अर्थात दोघात एक ! छान चवीचे जेवण व सोबत पंचमची गाणी ! अजून काय हवे? आज बरेच वर्षांनी संगीत के सितारे या ग्रुपवर गाणे पोस्ट केले. थीम मध्ये बऱ्याच गाण्यांचा चॉईस होता! थीम अशी होती की गाण्याच्या मुखडा व अंतरा कुठेही दिनांक, महिन्यांची नावे, किंवा आठवड्याची नावे, यापैकी एक आले पाहिजे. थीम वाचल्या वाचल्या पटकन एक गाणे डोळ्यासमोर आले ते म्हणजे सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन, ते कुणीतरी पोस्ट केले होते. नंतर एक गाणे आठवले ते म्हणजे सावन का महिना पवन करे सोर हे गाणे मला खूप आवडत नाही. नंतर एक आठवले ते पोस्ट केले. सावन के झूले पडे तुम चले आओ. संगीत अर्थातच आरडी बर्मन. जुर्मानातली गाणी मी पूर्वी म्हणायचे ते आठवले. त्यात अजून एक गाणे आहे तेही मला आवडते ते म्हणजे छोटीसी एक कली खिली थी एक दिन बागमें. हे गाणे मागच्या एका महिन्यात ऐकले होते आणि छान वाटले होते. तसेच आज झाले. एकाने चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी पोस्टे केले तर एकाने आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है, बागोमें बहार है हे ते गाणे ! एका पाठोपाठ बरीच गाणी आठवली व युट्युबवर पाहीली. विनुची आवडती गाणीही पाहिली. त्यात सावन के झुले पडे हे गाणे तलत आणि लताने गायले आहे. प्यार की प्यास या चित्रपटातले गाणे. शिवाय अजून एक त्यातलेच एक गाणे ऐकले.
नंतर मला आशा भोसलेचे दिवसामागुनी दिवस चालले ऋतु मागुनी ऋतू हे गाणे आठवले. या गाण्यातही मराठी महिने आहेत. तर आजचा दिवस आम्हाला दोघांना भूतकाळात घेऊन गेला. त्या दिवसात आम्ही दोघेही २ ग्रुपवर थीम आली रे आली की त्याप्रमाणे गाणी पोस्ट करायचो. खूप रमून जायचो आम्ही गाण्यात आणि एखादे चांगले गाणे पोस्ट करायचे निसटून गेले की हळहळ वाटायची. ते ग्रुप्स म्हणजे संगीत के सितार व गीतसंगीत.
Wednesday, February 18, 2026
Wednesday, February 11, 2026
11 February 2026 (fb memory)
fb memory 5 years ago
जगात खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत की त्या पाहिल्या की आनंद होतो. प्रत्येकाच्या जीवनात अशा काही खास गोष्टी असतातच की ज्या आठवल्या की तुमचे हृदय काही क्षणांकरता हेंदकाळते. हा अनुभव खरच खूप छान असतो. रोमांचकारी अनुभव. फळाफूलात असतो, गाण्यात असतो तर काही क्षण पूर्वाश्रमीचे असतात आणि अचानक आलेले असतात. ध्यानीमनी नसताना काही गोष्टी अश्या काही अचानकपणे घडून येतात की त्या आठवल्या की तुमच्या अंगावरून कोणीतर मोरपीस फिरवत आहे असे वाटते. प्रेमाला उपमा नसतेच कधी कारण कि ते देवाघरचे लेणे असते. असे लेणे की ते तुमच्या हृदयात कायमचे दडून बसते. रोज आठवत नाही तर मधूनच आठवते कधीकधी. त्याला वेळकाळ नसते. अखंड कामात बुडालेले असताना आठवते. निवांत क्षणी आठवते. गर्दीतून जात असताना आठवते . त्यात एखाद्या बाळाचा गोंडस चेहरा आठवतो तर एखाद्या फुलाचीही आठवण येते.
मला सर्व प्रकारची फुले आवडतात पण त्यात सुद्धा मला विशिष्ट रंगांची फुले जास्त आवडतात. ते रंग खूप मनमोहक असतात. तास न तास त्या फुलाकडे
बघत बसावेसे वाटते. त्याला लाभलेल्या रंगामुळे ती फुले खूप लोभस वाटतात. मन प्रसन्न करून टाकतात. गुलाबा मध्ये मला पिवळा गुलाब खूपच आवडतो. कण्हेरी मधला गुलाबी रंग काय वर्णावा, इतका छान असतो. अबोलीचा रंग काही न्याराच ना ! आणि किती तो नाजुकपणा ! सदाफुली तर तिच्या लव्हेंडर रंगामुळे शोभून तर दिसतेच पण तिच्या त्या पाकळ्या ! जास्वंदाला तर प्रत्येक रंग खुलून दिसतो.
शेवंतीचा पिवळा रंग हारापेक्षा माळलेल्या वेणीतच शोभून दिसतो. शेवंतीची जागा विणलेल्या वेणीतच हवी. जाई जुईचा रंग पांढरा पण जाईचे टपोरेपण मला जास्त आवडते. जाईच्या कळ्या तर बघत बसाव्यात इतक्या गोड ! सूर्योदय सूर्यास्त दोन्हीही छान पण मला सूर्योदय बघायला जास्त आवडतो. सूर्यास्ताच्या आधीचे रंग जास्त विलोभनीय वाटतात. पाणी सगळीकडेच वाहते पण पाण्याचे ओहोळ खडका खडकातून वाहताना किती छान दिसतात. पाण्याचे पांढरे शुभ्र धबधबे पाहण्यात मजा तर असतेच पण डोंगरावरचे छोटे छोटे धबधबेही तितकेच आकर्षक असतात.
ढग आकाशात निर्माण होतो आणि बघता बघता नाहीसाही होतो. वेगवेगळ्या आकाराचे ढग म्हणजे अगदी बारीक बारी गोलापासून ते पर्वता सारख्या दिसणाऱ्या प्रतिमेसारखे, येत जात असतात. त्यात घुसणारे रंग तर अप्रतिम. या रंगांमुळेच ढगांना शोभा येते. हे रंग अगदी जादू करावी असे निर्माण होतात. पिवळा, केशरी, गुलाबी, निळा , राखाडी आणि या रंगांच्याही वेगवेगळ्या छटा. हे रंग नीट पाहिले तर अगदी सेकंद सेकंदाला बदलत राहतात. हे ढगांचे साम्राज्य कुठून येते आणि कसे परत गायब होऊन जाते याची खरच खूप कमाल वाटते. पाऊस मला खूप जोरात पडलेला आवडतो. त्याच्या सरी दिसल्या पाहिजेत.
झाडांमध्ये मला डेरेदार झाडे जास्त आवडतात. ज्या झाडाच्या फांद्या पूर्णपणे झुकल्या आहेत आणि त्या फांद्यांखाली सावली निर्माण झाली आहे अशी झाडे आवडतात, की त्या सावलीत बसावे, बसताना झाडाच्या खोडाचा पाठ टेकण्याकरता आधार घ्यावा. बसून वर बघावे. झाडांच्या फांद्यांचे निरिक्षण करावे. समुद्र, तळे, नदी , त्यातले वेगवेगळे पाणी, कधी संध तर कधी उधाण आल्यासारखे वाहणारे. संथ पाण्यातले तरंग बघायला मला खूप आवडते. समुद्राच्या खवळलेल्या लाटा आणि त्या परतीच्या लाटांपेक्षा मला ओली वाळू जास्त आवडते. जी वाळू त्या लाटेनेच ओली झालेली आहे अशी वाळू. ज्यावरून चालतानाची मजा काही वेगळीच. या वाळूवरून चालताना एकीकडे लाटाही पाहता येतात आणि एकीकडे कोरडी वाळूही पाहता येते. तास न तास चालावे अशा या वाळूतून. मागे बघूच नये असे वाटते.
Sunday, February 08, 2026
मला आवडलेली लता मंगेशकर यांची गाणी
१) फैली हुई है सपनोंकी बाहे ..... (कल्पना कार्तिक)
२) कांटोसे खीच के ये आचल ..... (वहिदा रहेमान)
३) रिमझिम गिरे सावन ..... (मौसमी चटर्जी)
४) रूलाके गया सपना मेरा ...... (वैजयंतीमाला)
५) ए फसा ...... (बिंदू)
६) कुछ दिलने कहा .... (शर्मिला टागोर)
७) ओ घटा सावरी ..... (हेमामालिनी)
७) बंगले के पिछे तेरी बेरी के नीचे ..... (अशा पारेख)
८) नैनोमें बदरा छाए .... (साधना)
९) जरासी आहट होती है .... (प्रिया राजवंश)
१०) मोरा गोरा अंग लै ले ...... (नूतन)
११) पल भरमें ये क्या हो गया ..... (शबाना आझमी)
१२) अखियोंको रहेने दे ..... (डिंपल कपाडिया)
१३) माई री मै कासे कहू .... (रेहाना सुलतान)
१४) पानी पानी रे खारे पानी रे ( तब्बू)
१५) कारे बदरा तू न जा न जा ( नलिनी जयवंत)
१६) रहे ना रहे हम ....... (सुचित्रा सेन)
१७) दुश्मन ना करे दोस्त ने ..... (सिम्ता पाटील)
१८) राधा ने माला जपी ...... (मुमताज)
१९) बेईमान तोरे नैनवा निंदिया न आए..... (मधुबाला)
२०) किसीने अपना बनाके मुझ्को ...... (उषा किरण)
२१) कही तो मिलेगी बहारोंकी मंझिल ..... (मीनाकुमारी)
२२) जाने कैसे सपनोमें खो गयी अखिया ........ (लीला नायडू)
२३) सावन के झुले पडे ...... (राखी)
२४) जिंदगी प्यार का गीत है .... (पद्मिनी कोल्हापुरे)
२५) ओ बसंती पवन पागल .... (पद्मिनी)
२६) दिलबर दिल से प्यारे ..... (अरूणा इराणी)
२७) आजकल पाव जमी पर ..... (रेखा)
२८) मेरे हाथोमें नौ नौ चुडिया है ..... (श्रीदेवी)
२९) माये नि माये .... (माधुरी दिक्षित)
३०) तेरे मेरे बीचमें ......... (रती अग्निहोत्री)
३१) ना जिया लागेना .... (सुमित्रा संन्याल)
३२) जाने काहे जिया मोरा डोले ...... (शुभा खोटे)
३३) हवामें उडता जाए ..... (वीणा कुमारी)
३४) मुझे किसीसे प्यार हो गया ....... (नर्गिस)
३५) मस्त पवन है चंचल धारा ...... (कामिनी कौशल)
३६) मोरे नैना सावन भादो ........ (सिमी गरेवाल)
३७) जिया बेकरार है .... (निम्मी)
३८) किस लिए मैने प्यार किया ..... (नंदा)
३९) जोगियासे प्रीत किए दुख होय ...... (निरूपा राय)
४०) जा रे उड जा रे पंछी ..... (माला सिन्हा)
४१) धीरे धीरे मचल ए दिल ए बेकरार ..... (सुरेखा पंडित) ??
४२) बेचारा दिल क्या करे ...... (फरिदा जलाल)
४३) न जाने क्यु होता है ये जिंदगी के साथ ..... (विद्या सिन्हा)
४४) सुबह और श्याम काम ही काम ....... (सुलक्षणा पंडीत)
४५) मेहेलोंका राजा मिला के रानी बेटी राज करेगी ......... (जाहिदा)
४६) नदिया किनारे हेर आए आयी कंगना ..... (जया भादुरी)
४७) भोर भये पनघटपे ..... (झीनत अमान)
४८) आप मुझे अच्छे लगने लगे ..... (तनुजा)
४९) कब आओगे बालमा ........ (?? ?)
५०) पंख होते तो उड आती रे ...... (संध्या)
५१) ये दिल और उनकी निगाहोंके साये ..... (?? ?)
५२) हमने देखी है उन आखोंकी महकती ..... (?? ?)
५३) धानी चुनर मोरी हाय रे ..... (? ??)
Rohini Gore
Subscribe to:
Comments (Atom)




