Thursday, May 12, 2011

अरुणोदय

उठ मुला उठ मुला बघ हा अरूणोदय झाला
नवरंगी किरणांनी भुषविली ब्घ ही अवनी


मोदभर रानभरे मंद सुगंधा ते विखरे
शितल हा वात पाहा आळस हरण्या येत अहा

किलबिलती बागडती वृक्षावरती पक्षी किती
रव करिती भृंगतती पुष्पांचा मकरंद पिती

फुलांवरी फळांवरी पतंग मोदे मजा करी
झटकन बसे झटकन उठे उंच भराऱ्या घेत सुटे

आनंदे नभ कोंदे हरूनी आळसा तरतरी दे
पूर्वेला रवि आला मुला उठाया कथित तुला

कविः बालकवी ठोमरे

5 comments:

Mangalsingh Dhanawat said...

मी बर्‍याच दिवसांनी शोध घेत असलेली कविता मिळाली म्हणून चिक्कार आनंद झाला. मला ही कविता नव्हती पण माझ्या लहानपणी ताई नेहमी गुणगुणत असे म्हणून तिने (कवितेने) माझ्या मनात घर केले होते. ताई पण हल्ली पुण्यात राहते.
Thanks a lot RV (Rohini).Thank you so much.Actually I didn't know that this one is one of my favourite poet's ( T. B. Thombre) composition.
Mangalsingh Dhanawat, Jalna, Maharashtra.

Mangalsingh Dhanawat said...

Thanks Rohini for this poem.

rohinivinayak said...

Tumhala pan hi kavita aavadte he vachun malahi khup aanand jhala aahe !! thanks

Mangalsingh Dhanawat said...

मॅम तुमच्या "स्मृती " वरील तुमचे लेखन वाचवाचले.खुप आवडले.महाराष्ट्रात असूनही अमेरिकेची सफर केल्याचा आनंद मिळतो. मॅम तुम्ही सातासमुद्रापार असूनही भारतीय व्यंजन व संस्कृती जपलीये हे वाचून मन साभिमान भारावून गेले. तुमची लेखनशैली छान आहे. परंतु त्याहून अधिक वाखाणण्याजोगी आहे तुमची छायाचित्रणकला.What an excellent photography mam !!! I have downloaded most of them and shown to my family as well friends. in my staff also.
माझा भाचा US मध्ये आहे. विप्रो मध्ये साफ्टवेयर इंजिनिअर आहे.ततो पण पुण्याचाच आहे.
पुनश्च धन्यवाद मॅम.

rohinivinayak said...

Thank you very much !! for comliments !