Friday, April 24, 2015

Art Photography




















Friday, April 10, 2015

कविता

15 - 12 - 1997





नीलनभाच्या क्षितीजावर्ती फुलले जीवनमळे
ऐलतीरावर उभा राहूनी सारे मी पाहिले

वसंतामध्ये आताच कोठे फुलला नवा फुलोरा
कधीच होता गळून पडला सुकला पानपसारा
मृगधारातील कोमल जीवन वसुधेने वेचले ॥ १॥

बालपणीच्या सुखद अंगणी पडे फुलांचा सडा
मोरपिसांनी भरून गेला बालभारती धडा
बालपरांनी सावरलेले चिमणे पिलू उडे ॥२ ॥

अवघड गीते अवचित सरली गगनी दूर जाणारी
वात्सल्याची मने भेटली दुःखाश्रू पुसणारी
चंद्रकोरीतून मना माझ्या शरदचांदणे पडे ॥३॥

भयाणतेने सुटले वादळ सर्व फाटल्या दिशा
अधीरतेने सर्व वेचतो करी न दिसते उषा
पिंजून गेली सारी गात्रे नयनी आसू न उरले ॥ ४॥

poem by Mr. Nilkanth Balkrishna Ghate.

मी आईबाबांना फोन करते तेव्हा मागच्या आठवड्यातच बाबांना विचारले की तुम्ही कधी कविता केल्या का? तर ते हो म्हणाले. जास्ती नाही काही वेळेला सुचले तेव्हा दोन चार कविता लिहिल्या आहेत. मग मी त्या बाबांना शोधायला सांगितल्या. आज फोनवरून ऐकल्या आणि लिहून घेतल्या. त्या इथे देत आहे.

Wednesday, April 01, 2015

फुले पाने

या कलाकुसरीमध्ये गाजर, भेंडीच्या चकत्या, काकडीचे व सफरचंदाचे साल, कोथिंबीर व कोथिंबिरीची देठे वापरली आहेत.