Monday, December 31, 2012

नव वर्ष शुभेच्छा !तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा ! हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे, आनंदाचे, उत्साहाचे, उत्कर्षाचे, चैतन्याचे,  जावो ही हार्दिक शुभेच्छा !


Wednesday, December 19, 2012

पक्षी


आम्ही राहत असलेल्या अपार्टमेंटच्या समोर एक तळे आहे. तिथे दर हिवाळ्यात सीगल्स येतात. आज खूप आले होते. त्यांची बसण्याची जागा छतावर असते. अधुनमधून इकडे तिकडे बागडत असतात. तळ्यात पोहत असतात. खूप मजा आली आज हे सर्व पाहताना. मला सीगल्स खूपच आवडतात. निरागस असतात. उंच उंच उडून परत छतावर बसतात. हे सर्व पहायला खूप छान वाटते.