Saturday, November 08, 2008

Thursday, November 06, 2008

जाई
जाई! जाई व जुई मधली एक! जुईला तसे मी खूप वेळा पाहिलेले नाही. क्वचित एक दोनदा पाहिले असेल आणि ती खूप नाजुक आहे इतकेच माझ्या लक्षात राहिले आहे. जाई मात्र डोळ्यात, मनात, आठवणीत अगदी तुडुंबपणे भरून राहिली आहे.जाईचा वेल माझ्या बाबांनी अंगणात मोठ्या उत्साहाने लावला असेल त्यावेळेला, म्हणजे चाळीस एक वर्षापूर्वी. माझ्या बहिणीचा जन्म व जाई अगदी बरोबरीच्या म्हणले तरी चालेल. जाईने आमच्या कुटुंबाला अगदी भरभरून दिले आहे. आम्ही दोघी बहिणी लहान होतो तेव्हापासून आठवत आहे आई आम्हाला जाईचे गजरे करून द्यायची. लहानपणी बॉबकट असल्याने आई आमच्या डोक्यावर हा जाईचा गजरा एखाद्या चक्राप्रमाणे बांधायची.जाईचा विस्तार खूप मोठा होता. आमच्या घराचे छप्पर पत्र्याचे होते त्यामुळे अर्धा वेल पत्र्यावरच पसरलेला होता आणि अर्धा वेल अंगणातील मंडपावर होता. पावसाळ्यात जाईला खूप बहर यायचा, इतका की अंगणात पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा! शेजारच्या पाजारच्या बायका व मुली आमच्या अंगणात सडा वेचायला यायच्या. सर्व फुले वेचून झाली तरी काही वेळाने बघावे तर थोडीफार फुले पडलेलीच असायची. कधी जोराच्या वाऱ्याने पडायची तर कधी आपोआप गळून पडायची. सकाळी अभ्यास करताना एखादी नजर बाहेरच्या अंगणात गेली की अगदी त्याच वेळेला डोळ्यादेखत एखादे फूल पडलेले पाहिलेले आहे. आम्हा दोघी बहिणींना जाईच्या फांद्या हालवण्याचा नाद लागला होता, कारण फांद्या हालल्या की फुले पडायची आणि ती वेचायला खूपच मजा यायची.शाळाकॉलेजात जाताना रोज जाईच्या टपोऱ्या फुलांचा गजरा! लांब केस असल्याने आई आमच्या दोघींची घट्ट पेडीच्या दोन वेण्या घालायची. एका वेणीवर खूप मोठा गजरा. त्याचे एक टोक वेणीच्या वरच्या पेडाला बांधायचे व एक टोक सर्वात खालच्या पेडाला. कधी उजव्या वेणीवर तर कधी डाव्या! त्यावेळेला डाव्या वेणीवर गजरा बांधायची फॅशन होती. काही वेळेला गजरा वेटोळा करून त्यात क्लिप अडकवून कानाच्या बाजूला ती क्लिप लावायचो तर कधी गजऱ्याचे दोन एकसारखे भाग करून मध्ये क्लिप लावून! शाळेला खूप उशीर होत असेल तर सेफ्टी पीनेमध्ये फुले ओवायची व ती वेणीच्या पेडात बांधायची.दुपारचे शाळाकॉलेज असेल तर सकाळचा अभ्यास झाल्यावर स्टुलावर चढून फुले काढायचो. जी फुले काढेल तिने दुसरीला विचारायचे की तू घालणार आहेस का गजरा म्हणजे तुझी पण फुले काढते. शाळाकॉलेजातून संध्याकाळी घरी येईपर्यंत गजऱ्यातील काही फुले सुकून ती चॉकलेटी रंगाची दिसू लागायची. शनिवारचे सकाळी शाळाकॉलेज असायचे तेव्हा मात्र शुक्रवारी संध्याकाळीच कळ्यांचा गजरा करून तो ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवायचा, म्हणजे मग सकाळी उठल्यावर उमललेल्या फुलांचा गजरा तयार! आम्ही जसे आमच्यासाठी गजरे करायचो त्यात अजून एक गजरा प्लॅस्टीकच्या पिशवीत घेऊन जायचो, कधी आमच्या मैत्रिणींकरता तर कधी शाळेतल्या बाईंकरता.रविवारी सुट्टीच्या दिवशी किंवा सणावारांच्या दिवशी जाईचे गजरे करण्याचा आम्हा दोघी बहिणींचा खूप मोठा कार्यक्रम असायचा. दुपारी जेवणे उरकली की आम्ही जाईच्या कळ्या काढायचो. टपोऱ्या गुलाबी रंगाच्या कळ्या मला अजूनही जशाच्या तश्या आठवत आहेत. आधी पत्र्यावर जाऊन कळ्या काढायचो. त्यात आमच्या मैत्रिणीपण असायच्या. आमच्याकडे काही ऍल्युमिनियमच्या व काही स्टीलच्या चाळण्या होत्या, काही टोपल्या पण होत्या. त्यामध्ये सर्व कळ्या व फुले काढायचो. खूप खूप कळ्या!! टोपल्यांमध्ये साठलेल्या भरगच्य गुलाबी रंगांच्या कळ्यांकडे बघत बसावेसे वाटायचे! कळ्या काढताना आई नेहमी ओरडयची, कळ्या काढा पण मुक्या कळ्यांना हात लावू नका. मुक्या कळ्या म्हणजे खूप बारीक कळ्या की ज्यांना उमलायला अजून बराच काळ आहे.पत्र्यावरच्या कळ्या काढून झाल्या की मंडपावर पसरलेल्या वेलीवरच्या काढायच्या. जाईच्या अवाढव्य व अगणित फांद्या सगळीकडे फोफावल्या होत्या. बऱ्याच फांद्या अंगणाकडे झुकल्या होत्या. सहज हाताने पण त्यावरील कळ्या काढता यायच्या. मंडपावरील वेलावरच्या कळ्या आम्ही स्टुलावर उभे राहून काढायचो. स्टुलावर उभे राहून सुद्धा आम्हाला आमची पावले उंच करायला लागायची, इतका उंच वेल होता! मातीचे अंगण खडबडीत असल्याने स्टुलावर उभे राहिले की ते डुगडुगायचे! स्टुलावर उभे राहून डुगडुगणारे स्टूल एका जागी स्थिर झाले की मग वेलाकडे बघून नजरेत येतील इतक्या कळ्या एका हाताने तोडून त्या मग चाळणीत टाकायच्या. एकीने कळ्या काढायच्या व त्याच वेळी दुसरीने चाळणी घेऊन स्टुलाच्या बाजूला उभे रहायचे, असे आलटून पालटून. त्यातही आमची भांडणे " ए काय गं, किती काढतेस ग कळ्या! मला काढू देत ना थोड्यातरी! "अगं होना काढं की मग! ह्या बाजूच्या मी काढते तू दुसऱ्या बाजूच्या काढ." मग स्टूल एक्या जागेवरून दुसरीकडे न्यायचो. आमच्या शेजारच्या काही छोट्या मुली पण यायच्या, त्याना पण स्टुलावर उभे राहून फुले काढायची इच्छा असायची. पण आम्ही त्यांना ओरडायचो, तुम्ही अजून लहान आहात ना, स्टुलावर उभे राहून पडलात म्हणजे! त्यापेक्षा तुम्ही खाली पडलेली फुले वेचा.सर्व कळ्या व फुले काढून झाल्यावर मग आई प्रत्येकाचे वाटे करायची. आमच्या मैत्रिणी पण खूप खुश व्हायच्या! कळ्या फुले काढून झाल्यावर नंतरचा कार्यक्रम म्हणजे देवांच्या तसवीरींना हार, आजीआजोबांच्या फोटोला हार, व आम्हाला गजरे. हार व गजरे करता करताच कळ्या हळूहळू उमलायला लागायच्या. अर्धवट उमललेल्या कळ्यांचे हार व गजरे तर इतके काही सुंदर दिसायचे ना!! गणपतीच्या दिवसात आमच्या घरच्या गणपतीला जाईच्या फुलांचा भरगच्च हार असायचा, त्यात अधूनमधून जास्वंदीचे लालचुटूक फूलही असायचे. आमच्या घरामध्ये जाईच्या सुगंधाचा नुसता घमघमाट असायचा!! रात्रीच्या जेवणानंतर अंगणात गप्पा मारायला बसायचो तेव्हा जाईच्या वेलीवरती अगणित फुले, जणू काही पांढऱ्या शुभ्र चांदण्याच!अजूनही जाई आमच्या अंगणात आहे. पुढच्या भारतभेटीमध्ये डीजीकॅमने खूप खूप फोटो काढणार आहे मी जाईचे!!! त्या क्षणाची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे!!!!!


जाईची फुले मला माझ्या मैत्रिणीकडून मिळाली आहेत. तिचे नाव भाग्यश्री. धन्यवाद भाग्यश्री.  जाईच्या गुलाबी कळ्या चिंतामणी पळसुले यांच्या बागेतल्या आहेत. धन्यवाद!

Monday, October 27, 2008

Thursday, September 25, 2008

४ सी अग्रेसर, अंधेरी, मुंबई
जिंदगी, जिंदगी मेरे घर आना, आना जिंदगी
जिंदगी, हो जिंदगी मेरे घर आना, आना, मेरे घर आना, जिंदगी....

मेरे घर का सीधासा इतना पता है
मेरा घर जो है चारो तरफसे खुला है
न दस्तक जरूरी, न आवाज देना
मेरे घर का दरवाजा कोई नही है
है दिवारे गुम और छत भी नही है
कडी धूप है तो, कडी धूप है तो
तेरे आँचल का साया चुराके
जीना है जीना जिंदगी, हो जिंदगी, मेरे घर आना आना जिंदगी....

मेरे घर का सीधासा इतना पता है
मेरे घर के आगे मुहोबत लिखा है
न दस्तक जरूरी ना आवाज देना
मै साँसोकी रफ्तारसे जान लुँगी
हवाओंकी खुशबुसे पहचान लुँगी
तेरा फूल हुँ तो तेरी धूल हँ तो
तेरे हाथोमें चेहरा छुपाके
जीना है जीना जिंदगी, हो जिंदगी, मेरे घर आना आना जिंदगी....

मगर अब जो आना तो धीरेसे आना
यहाँ एक शहजादी सोयी हुँयी है
ये बगीयोंके सपनोमें खोई हुँयी है
बडी खूब है ये, तेरा रूप है ये
तेरे आँगनमें तेरे दामनमें
तेरी आँखोपें तेरे पलकोंपे
तेरे कदमोपें इसको बिढाके
जीना है जीना जिंदगी, हो जिंदगी, मेरे घर आना आना जिंदगी....

चित्रपट - दूरियाँ , संगितकार -जयदेव

Saturday, September 20, 2008

अमेरिकेत पाऊल पडल्यावर...छोट्या बंगल्यातला आतील भागप्राध्यापकांचा बंगलाया छोट्या बंगल्यात आमची राहण्याची तात्पुरती सोय झाली होती.बंगल्यासमोरी तळे जिथे मी उभी राहून लाटांकडे बघत रहायचे.
अमेरिकेतल्या डॅलस विमानतळावर विनायकचे प्राध्यापक ऍलन आम्हाला न्यायला आले होते. हस्तांदोलन करून अवाढव्य बॅगांसकट आम्ही त्यांच्या कारमध्ये बसलो. प्राध्यापक खूपच बोलके होते. त्यांच्या व विनायकच्या गप्पा सुरू होत्या. मी मात्र मागच्या सीटवर बसून "कुठून आलो या परक्या देशामध्ये!! " असा अवस्थेत होते. कार डेंटन शहरकडे धावत होती.


त्यांच्या घरी आल्यावर त्यांची चिनी बायको नॅन्सी हिने सहतमुखाने आमचे स्वागत केले. त्यांच्या बंगल्याशेजारीच एक छोटा बंगला आहे तिथे आमची राहण्याची व्यवस्था झाली. नॅन्सीने आम्हाला कुठे काय ठेवले आहे हे सांगितले आणि थोडी विश्रांती घेऊन जेवायला या असे सांगितले.


दुसऱ्या दिवशी प्राध्यापकांबरोबर विनायक सकाळी ८ लाच न्याहरी करून विद्यापीठात गेला. आता फक्त मी व नॅन्सी. नॅन्सी खूप बोलकी होती त्यामुळे मला खूपच बरे वाटले. त्यांच्या शेजारचा बंगला थोडे दिवस का होईना आमचा होता! तिने मला फ्रीजमध्ये काय काय आहे हे सांगितले आणि ते संपले की मला सांगा म्हणजे मी तुम्हाला ते आणून देईन. फ्रीजमध्ये nonfat milk, no sugar added ice cream, apple juice , orange juice होते आणि शिवाय बाहेर ओट्यावर चहा, साखर, कॉफी हे पण होते.


आम्हाला आमचे अपार्टमेंट मिळेपर्यंत आमचा दिनक्रम ठरलेला होता. सकाळी ८ ला न्याहरी व रात्री ऍलन व विनायक आले की ८ ला जेवण. मला तसा एकटेपणा आला नाही, पण दिवसभर करणार काय? कारण की स्वयंपाक नाही, धुणेभांडी नाहीत, दूरदर्शनवर बघावे तर तिच्याकडे ठराविकच चॅनल्स होते. काही मासिके होती वाचायला. भूक तर सारखी लागलेलीच असायची कारण न्याहरीला कोक, ज्युस, ब्रेड आणि जेवायला उकडलेले कणीस, बिनाचवीचे उकडलेले नूडल्स इतकेच.


दुपारी नॅन्सीला भूकच लागायची नाही, शेवटी भुकेने हैराण होऊन मीच तिला तिच्या बंगल्यात विचारायला जायचे की आपण जेवायचे का? हळूहळू मी नॅन्सीशी बोलू लागले. तिला सांगितले की तुझा बंगला खूप छान आहे मला आवडला, मी तुझ्या बागेला पाणी घालते, मला बागकाम करायला खूप आवडते असे म्हणल्यावर ती खूप खुश झाली आणि खूप गप्पाही मारू लागली. तिने मला विचारले की तुझे घर कुठे आहे, तुला इथे बोअर होते का?, तुझे आई वडील कुठे असतात, अशा एक ना अनेक गप्पा!! रोज कुठे ना कुठे मला बाहेर घेऊन जायची. शिवाय आमच्या अपार्टमेंटच्या शोधात पण आम्ही बाहेर पडायचो.


नॅन्सी जरी गपिष्ट होती आणि मला तिने कधी एकटी पडू दिले नाही तरी काही वेळा ती तिच्या वैयक्तिक कामाकरता बाहेर पडायची तेव्हा तर मला खूप एकटेपणा जाणवायचा. त्यावेळेला मी घरात रहायचे नाही. त्यांच्या घरासमोर एक भलेमोठे तळे होते, त्या तळ्याच्या काठावर मी उभी रहायचे. लाटांकडे बघायचे. त्या लाटांकडे बघता बघता मला भारतातल्या सर्वांची इतकी काही आठवण यायची की गदगदून रडू फुटायचे. लाटांना डोळ्यात साठवत रहायचे. शून्यात नजर लावून त्या लाटांकडे बघायचे , जणू काही मी त्या लाटांशी बोलायचे. त्या तळ्याला मी अजूनही विसरणे शक्य नाही.


भारतातून अमेरिकेत येण्या आधी धावपळ, गडबड यामुळे प्रचंड दमणूक झाली होती आणि इथे आल्यावर एकदम शांतता, स्वच्छ हवा व भरपूर वेळ!! ऐसपैस पलंगावर पडून ढाराढूर झोपावेसे वाटत होते पण झोप काही केल्या येत नव्हती. एक तर त्या बंगल्याच्या दारावर बेल नसल्यामुळे नॅन्सी आली आणि तिने दारावर 'टकटक' केले तर ते आपल्याला ऐकू येईल का? या भीतीने झोप यायची नाही आणि डोळे मिटले की मुंबईतली गर्दी आणि आईबाबांचे चेहरे दिसायचे. इतक्या मोठ्या बंगल्यात अजिबात करमायचे नाही. एकदा तळ्यावर चक्कर, एकदा बागेत झाडांना पाणी घालणे, एकदा नॅन्सी काय करते हे बघायला तिच्या दारावर टकटक. हे सर्व करून घरी परत आले की माझा मलाच खूप राग यायचा. कितीही काही केले तरी वेळ पटापट का जात नाहीये आणि एकदम मला आठवण झाली " की अरे आपण कॅमेरा आणला आहे की!! " मग मात्र वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मिटला. मग काय नुसते खटाखट फोटो काढत राहिले. फूल दिसले, काढ फोटो! पान दिसले काढ फोटो!आम्ही ज्या छोट्या बंगल्यात राहत होतो तिथे फोन दिसत होता, पण विचारायचे कसे ना की आम्हाला घरी बोलायचे आहे म्हणून. ईमेलने खुशाली कळवली होती पण प्रत्यक्ष बोलणे वेगळेच असते ना! दिवस खूपच संथ गतीने जात होते. त्या रिकामटेकड्या वेळामध्ये मी सासू सासरे व आईबाबा यांना सविस्तर पत्रे लिहिली. नुसती पत्रेच लिहिली नाहीत तर त्या पत्राची पारायणे केली. कल्पना केली, आपल्या आईच्या दारात माझे पत्र पडेल. मग आई ते उचलून बाबांना म्हणेल, बर का हो! आपल्या रोह्याचे पत्र आले आहे. मग बाबा म्हणतील, हो का! काय म्हणतेय?! मग दोघे मिळून माझे पत्र वाचतील व त्यांच्या चेहऱ्यावरचे उमटलेले भाव मला इतक्या हजारो मैल दूर राहून पण पोहोचतील. नॅन्सीला सांगितले की मला पत्र पोस्ट करायची आहेत. ती म्हणाली की ती चीनमध्ये राहणाऱ्या तिच्या आईवडिलांना पत्र लिहीते. तिला तिच्या मातृभाषेत पत्र लिहायला आवडतात. मनात म्हणाले की ही अगदी माझ्यासारखीच दिसते. मला पण मराठीतून पत्र लिहायला खूपच आवडते!


संध्याकाळी ८ ला ऍलन व विनायक घरी आले की लगेचच जेवण! जेवणाच्या वेळेस मात्र आमच्या चोघांच्या गप्पा खूप रंगायच्या. त्यातून ऍलन यांच्याकडे Indian Post-Doc असल्याने त्याला बऱ्यापैकी भारतीय खाद्यपदार्थांची माहिती होती आणि चक्क त्याला डोसा प्रिय होता. मला विचारले तुला डोसा येतो का? मी आनंदाने हो येतो की!! लगेच नॅन्सीने मला विचारले की डोसा कसा करायचा ते सांग, त्यासाठी काय काय लागते वगैरे. तिच्याकडे चक्क तांदुळ व काही डाळी होत्या, काही भारतीय मसाले पण होते! तिला रेसिपी सांगितली. डोश्याची लांबलचक रेसिपी तिला आवडलेली नसावी, तिचा चेहराच सांगत होता. डाळ तांदुळ भिजले, पण ते १०-१२ तासानंतर वाटले गेले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी वाटले गेले. तात्पुरते त्यातले पाणी काढून फ्रीजमध्ये ठेवले. डाळ तांदुळ वाटून १०-१२ तासांनी ते फसफसले पण! मग म्हणाली की उद्या करायचे का डोसे? परत पीठाची रवानगी फ्रीजमध्ये! शेवटी एकदाचे तिसऱ्या दिवशी ते डोसे झाले. खरे तर तांदुळाची धिरडीच लागत होती, कारण ज्या प्रमाणात उडीद डाळ पाहिजे त्याप्रमाणात ती नव्हती. ऍलन यांनी मात्र आवडीने डोसे खाल्ले. उकडून बटाट्याची भाजी पण केली होती. त्यांनी ती भाजी डोश्यामध्ये घातली. त्याचा सँडविच सारखा चौकोनी आकार केला व आपण सँडविच कसे खातो त्याप्रमाने त्यांनी डोसे खाल्ले. नॅन्सीला मात्र डोसे आवडले नाहीत.५-६ दिवसांनी आमचे अपार्टमेंट फिक्स झाले. एक दिवस त्या दोघांनी आम्हाला भारतीय उपहारगृहात जेवण दिले. काही जरूरीच्या गोष्टी घेण्यासाठी आम्ही काही दुकानातून हिंडलो. एक दिवस त्या दोघांनी आम्हाला परत सर्व सामानासकट पोहोचते केले. अच्छा बाय बाय टाटा करत त्यांनी आमचा निरोप घेतला. साधारण आठवडाभर आम्ही त्यांच्याकडे होतो. अमेरिकेतला हा अनुभव खूपच वेगळा होता आणि संस्मरणीय ठरला!!

Tuesday, August 05, 2008

कहीं दूर जब दिन ढल जाए .......


कहीं दूर जब दिन ढल जाए साँज की दुल्हन बदन चुराए चुपकेसे आए
मेरे खयालो के आँगनमें कोई सपनोंके दीप जलाए दीप जलाए
कहीं दूर......

कभी युही जब हुई बोझल साँसे, भर आई बैठे बैठे जब युही आँखे
तभी मचलके प्यार से छलके छुए कही मुझे पर नजर ना आए नजर ना आए
कहीं दूर.......

कहीं तो ये दिल कभी मिल नही पाए, कहींसे निकल आए जन्मोंके नाते
घनी थी उलझन बैरी अपना मन अपनाही होके सहे दर्द पराए दर्द पराए
कही दूर.......

दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, हो गए कैसे मेरे सपने सुनहेरे
ये मेरे सपने यही तो है अपने मुझसे जुदा न होंगे इनके ये साए इनके ये साए
कहीं दूर.....


गीतकार - योगेश, चित्रपट - आनंद
Tuesday, July 29, 2008

सुहाना सफर और ये मौसम हँसी....

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

कवी - बालकवी

सुहाना सफर और ये मौसम हँसी
हमें डर है हम खो न जाए कही
सुहाना सफर और ये मौसम हँसी

ये कोन हँसता है फूलोमें छुपकर
बहार बेचैन है जिसकी धुनपर
कही गुनगून कही रुनझून
के जैसे नाचे जमी

ये गौरी नदियों का चलना उछलकर
के जैसे अल्हड चले जिसपे मिलकर
प्यारे प्यारे ये नजारे निसार है पर कही

वो आसमाँ झुक राहा है जमी पर
ये मीलन हमने देखा यही पर
मेरी दुनिया मेरे सपने मिलेंगे शायद यही

चित्रपट - मधुमतीरजनीगंधा फूल तुम्हारे .....

रजनीगंधा फूल तुम्हारे महेके युही जीवनमें
युही महेके प्रीत पियाकी मेरे अनुरागी मनमें

अधिकार ये जबसे साजन का हर धडकन पर माना मैने
मै जबसे उनके साथ बंधी ये भेद तभी जाना मैने
कितना सुख है बंधनमें

हर पल मेरी इन आँखोमे बस रहते है सपने उनके
मन कहता है मै रंगोंकी ये प्यार भरी बदली बनके
बरसु उनके आँगनमे

गीतकार - योगेश
चित्रपट - रजनीगंधा


Tuesday, July 22, 2008

रिमझिम गिरे सावन ......

रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन
भिगे आज इस मौसममें लगी कैसी ये अगन

पहले भी युँ तो बरसे थे बादल
पहले भी युँ तो भीगा था आँचल
अबके बरस क्युँ सजन सुलग सुलग जाए मन
भिगे आज इस मौसमें लगी कैसी ये अगन

इस बार सावन बहका हुआँ है
इस बार मौसम बहका हुआँ है
जाने पीके चली क्या पवन
सुलग सुलग जाए मन
भिगे आज इस मौसममें लगी कैसी ये अगन

गीतकार - योगेश , चित्रपट - मंजिल