Tuesday, April 12, 2011

दिनांक १२ एप्रिल २०११

गेल्या आठवड्यात सहज एक विचार मनात आला की रोजनिशी लिहावी का? गुढीपाडव्यापासून सुरवात करणार होते पण आता आजपासून सुरवात करूच असे ठरवून दिवस संपायच्या आत झोपण्या आधी टंकीत करत आहे.



खूप पूर्वी एक दोन वेळा असे ठरवले रोजनिशी लिहायचे ठरवले होते आणि असेच काही लिहिलेही होते काही दिवस. रोजनिशी म्हणजे रोजच्या रोज लिहायचे पण ते काही जमले नाही आणि आताही ठरवले तर जमेलच असे नाही पण ज्यादिवशी लिहीन त्या दिवशीचे तरी नंतर वाचताना किती छान वाटेल ना म्हणून सुरवात करत आहे.



आज सकाळी फेसबुकवर गेले तर एका मनोगती कुटुंबमित्राने "हे रोमरोममें बसनेवाले राम" हे गाणे लोड केले होते. छान आहे हे गाणे. रामनवमीच्या दिवशी मी "राम जन्मला गं सखी" गाऊन युट्युबवर टाकणार होते पण मला एक कल्पना सुचली. ही कल्पना माझी नाही. युट्युबवर एकाने काही एकाच संगीतकाराची काही गाणी एकापाठोपाठ एक "प्रत्येक गाण्याच्या दोन ओळी" याप्रमाणे टाकली होती. याचप्रमाणे मी आज गीतरामायणातील अठरा गाण्यांच्या दोन दोन ओळी गुणगुणून युट्युबवर लोड केल्या.



आईबाबांना फोनवरून या दोन दोन ओळी ऐकवल्या. त्यांनाही छान वाटले. आईबाबा आज एके ठिकाणी रामनवमी उत्सवाला जाऊन आले होते त्यामुळे त्यांचाही आजचा दिवस खूप छान गेला. संध्याकाळी ऑर्कुटवर जे फोटोज पूर्वीच टाकले होते त्यातले काही खूप चांगले फोटोज डाऊनलोड केले व ते फेसबुकवर लोड केले. आता उद्या परवाकडे ब्लॉगवर टाकीन. पूर्वीचे फोटोज पाहताना मनात विचार आला की पहिला घेतलेला डिजीटल कॅमेराच जास्त चांगला होता.



आज दुपारी खूप गार झाले. पाऊस पडला. ढगाळ वातावरण तसेच पुढे राहिले. नंतर खूप गरम व्हायला लागले. नंतर परत एकदा फेसबुकवर चक्कर मारली आणि एका मैत्रिणीच्या फोटो अल्बम मध्ये चेरीब्लॉसमचे फोटोज पाहिले. इथे अजून आम्हाला जायचे आहे. रात्री गरम गरम आमटी भात खाल्ला. रोजनिशीमध्ये चार ओळी खरडायच्याच असे ठरवून टंकीत आहे.

4 comments:

Swati Milind said...

खूपच सहज सुंदर लिहिले आहेस... रोहिणी!

rohinivinayak said...

Swati, Anek Dhanyawaad! :)

mau said...

मस्त..तुझा हाच उत्साह मला फार आवडतो...नित्यनविन काहितरी करत रहाणारी माणसे मला खरच खुप आवडतात..keep it up !!

rohinivinayak said...

Thanks uma, gulabkalya lavkarach taken ga!