आज अचानक मला सकाळी सकाळी पूर्वीच्या टु इन वन व कॅसेटची आठवण आली. काही महिन्यांपूर्वी मी अशीच एकदा पूर्वीची एक कॅसेट लावून ऐकत होते. ही सोनीची कॅसेट मी बाबांकडून घेतली होती जेव्हा आमच्याकडे आमचा नवीन व पहिलावहिला टु इन वन आला होता तेव्हा. त्यावर मी रेडिओवरून बरीच आवडीची गाणी टेप केली होती.
आज अशीच tape लावून बसले होते. त्यात कॅसेटची एक बाजू ऐकायची राहिली होती म्हणून कॅसेट उलटी करून ऐकायला सुरवात केली तर एकदम मजाच वाटली. त्यात सुरवातीला मी व बाबांनी गाणी गायली होती. नवीन टेप असल्याने आम्हाला दोघांना भारी उत्साह. लगेच गाणी टेप केली होती. बाबा जेव्हा गात होते तेव्हा आम्ही दोघी मी व आई स्वयंपाकघरात काम करता करता जोरजोरात बोलतही होतो. बाबांनी शरदाचे चांदणे मधुबनी हे गाणे गायले होते व मी चांदणे शिंपित जाशी. लगेच युट्युबवर ही जुनी आठवण रेकॉर्ड केली. जेवण केल्यावर दुपारी त्या कॅसेटमधली उरलेली रेकॉर्ड केलेली गाणी ऐकली. खूप चांगली आणि स्पष्ट टेप झाली आहेत. खूप मजा वाटली.
नंतर कॅसेटचा फोटो काढला. आजचा दिवस सोनी कॅसेटचा होता. खूप वेगळा दिवस गेला आज. आज इथे एकदम खूपच गरम होत होते. आज कांदा चिरताना अशीच एक कलाकुसर बनवली गेली.
No comments:
Post a Comment