Tuesday, April 12, 2011

चैत्रमास, त्यात, शुद्ध नवमी ही तिथी...




स्वये श्रीरामप्रभू ऐकती,
कुशलव रामायण गाती

सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

उगा का काळीज माझे उले
पाहूनी वेलीवरची फुले

तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो हा माझा सन्मान
दशरथा घे हे पायसदान

चैत्रमास त्यात शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला
राम जन्मला ग सखी राम जन्मला

सावळा गं रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो

ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा
यज्ञ रक्षणास योग्य तोचि सर्वथा

चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला
पहाया जनकाची मिथिला

आकाशाही जडले नाते धरणीमातेचे
स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे

रामाविण राज्यपदी कोण बैसतो?
घेऊनिया खड्ग करी, मीच पाहतो

निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथे सीता

नकोस नौके परत फिरू गं नकोस गंगे ऊर भरू
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू
जयगंगे जय भागिरथी जय जय राम दाशरथी

या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी
या इथे लक्ष्मणा बांध कुटी

शेवटी करिता नम्रप्रणाम
बोलले इतुके मज श्रीराम

दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा

तोडिता फुले मी सहज पाहिला जाता
मज आणुनी द्या तो हरिण अयोध्यानाथा

बांधा सेतु, सेतु बांधा रे, सेतु बांधा रे सागरी
सेतु बांधा रे सागरी, सीयावर रामचंद्रकी जय

मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे
पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे
मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे

रघुराजाच्या नगरी जाऊन,
गा बाळांनो श्रीरामायण
गा बाळांनो श्रीरामायण

गीत : ग. दि. माडगुळकर, गायक व संगीतकार : सुधीर फडके, गीतरामायण

No comments: