Monday, September 24, 2018

२४ सप्टेंबर २०१८

आज मला कामावर ऑफ होता त्यामुळे सकाळी सावकाशीने उठले. विनुलाही थोडे बरे वाटत नसल्याने तोही कामावर गेला नाही. बरे वाटत नव्हते म्हणजे काहीवेळेला हवा सतत बदलती असल्याने अंगदुखी आणि ताप आल्यासारखे वाटते तसे झाले होते. माझेही तसेच झाले होते थोडेफार. पण मग काहीतरी दिवसाचा वेगळेपणा होण्यासाठी मी आज वालमार्टला जायचे ठरवले. नेटही नव्हते. मग घरी बसून करायचे काय?   निघताना उसळ भात खाऊन निघाले. विनुने मला दुकानात सोडले आणि तो घरी आला. आज मी रिलॅक्स मूड मध्ये मला जे काही पाहिजे होते ते बघितले. तीन तास "हे बघ ते बघ" करण्यात गेले.


रविवारी ग्रोसरी केली नव्हती म्हणून बाकीचीही ग्रोसरी केली. त्यामध्ये आज हिरवी द्राक्षे बरीच आली  होती, ती घेतली. अनसॉल्टेड दाणे घेतले. कानातले तर मी नेहमीच बघते. त्यात मी आज कानातले भोपळे घेतले.
बाकी नेहमीचीच आठवड्याची  भाजी, दुध, दही, कांदे बटाटे वगैरे खरेदी केली.  विनू मला घरी आणण्यासाठी वालमार्ट मध्ये आला. आज दिवसभर आकाश ढगाळलेलेच होते. मला उद्या कामावर जायचे नसल्याने आज निवांतपणा आहे. उद्याची पोळी भाजी करून झोपायच्या आधी या वेगळ्या दिवसाची रोजनिशी टंकत आहे. कानातले भोपळे आता मी कामावर जाईन तेव्हा घालीन आणि आज मला दुकानात बॅकपॅकही छान मिळून गेली.


१० डॉलर्सची मुळ किंमत मला सेल मध्ये ३ डॉलर्स ला मिळाली. ती पण एखाद दिवशी कामावर घेऊन जाईन.त्यात  जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बाटली, स्वेटर आणि टोपी  हे सर्व नीट  मावेल का ते आधी बघितले पाहिजे. मावल्यास तीच कामावर जाण्याची बॅग करीन. अर्थात त्याला पर्स सारखे आतले कप्पे नाहीयेत त्यामुळे बाकीचे सर्व कश्यात ठेवायचे? म्हणजे पैसे, क्रेडीट कार्ड, फोन,
फोनची डायरी, पेन. किंवा मग त्याकरता एक छोटी हातातली पर्स घ्यावी लागेल आणि मग ती त्यात घालून ही बॅकपॅक न्यायला सुरवात करायची काअसा विचार चालू आहे. 

8 comments:

आंबट-गोड said...

RohiniTai , Tumhi ha blog Marathi Blog Katta la kasa jodala ahe?
I mean tyanchya list madhe ha blog kasa disato?
I want to link my blog to it.......

Ashwini

rohinivinayak said...

Hi Ashwini,,, mi ha blog marathiblogs dot net la jodla aahe,,khup purvich,, to kasa jodla te aathvat nahi aata.

paN marathi blog katta ithe nahi jodla,, tithe to disto aahe? mala link deshil ka?

thanks Ashwini !!

आंबट-गोड said...

http://blogkatta.netbhet.com/ ..Ithe check kara... :-)

rohinivinayak said...

Thank you Ashwini,,, link open karun pahate mi

rohinivinayak said...

Ashwini,,, mala blog kattyavar majha blog disla nahi :( mi khup shodhle,, parat ekada pahin.

आंबट-गोड said...

Ho? Mala tar disatoy.
ujavya hatala khali scroll karun "Smruti" asa naav disata na...............List madhe.(KattyavarIl Mandali)

rohinivinayak said...

thanks ashwini,, baghte kattyavaril mandali madhe,, :)

rohinivinayak said...

Hi Ashwini,,, Disla majha blog ujvikade kattyavaril mandali madhe,, Thanks a Lot !!