Wednesday, March 05, 2014

५ मार्च २०१४आजचा दिवस थोडासा त्रासदायक पण तरीही आनंदाचा होता. विनायकबरोबर आज मी इथल्या विद्यापीठात गेले. तिथे त्याचे काही काम असते तेव्हा तो मला नेहमी म्हणतो चल माझ्याबरोबर कारण की विद्यापीठात मला नेहमी काहीतरी वेगळे मिळून जाते आणि लगेच मला "क्लिक" करायला संधी मिळते. स्प्रिंग सुरू झाला आहे त्यामुळे त्याची पालवी फुटून वेगवेगळी फुले पण दिसतात. काही वेळा जाते आणि काही वेळा म्हणते नको, मला आता फोटोग्राफीचा कंटाळा आला आहे. आज बरेच म्हणजे बरेच  महिन्यांनी  विद्यापीठात गेले. नेहमीप्रमाणे मला आजही फुले दिसली. खरे तर ही फुले मी यापूर्वीही घेतलेली आहेत पण आज पावसात भिजलेली व झाडाखाली सडा पडलेली दिसली. त्यामुळे खटाखट त्याचे फोटोज घेतले. घरी आले आणि संगीतके सितारे या ग्रुपमध्ये कोणती थीम आली आहे ते बघितले. शब्द होता अंगडाई ...

या अंगडाई शब्दाने माझी पूर्ण दुपार डोके खाजवण्यात गेली. ली प्यारने अंगडाई दिवाना हुवा बादल हे गाणे आधीच कोणीतरी टाकले होते त्यामुळे ते गाणे गेले     मला हे गाणे खूप म्हणजे खूप आवडते. असे आवडते गाणे टाकायला मिळाले नाही तर चुटपुट लागून राहते.  गुगलींग केले. त्यात "कजरा रे कजरा रे" गाणे सापडले. तेही कोणीतरी टाकले होते. पूर्वी मी गाणे पाहिले होते पण आज पाहिले आणि इतके काही आवडून गेले की परत परत पाहिले. एक तर आवडता अमिताभ  होता आणि ठेकाही मस्त जमून गेला होता. गुलजार यांचे शब्द तर काय त्या त्या गाण्याच्या संदर्भात फिट्ट असतात. मला गुलजारची गाणी आवडतात. एकूणच या गाण्याचे सर्व छान जमले आहे. काही काही गाणी अशी असतात की सगळे छान जमून जाते. शेवटी एक गाणे मिळाले ते टाकले, का करू सजनी आए ना बालम, यात अंगडाई शब्द आहे.  अंतऱ्यामध्ये "भोर भई और सांज ढली रे, समयने ली अंगडाई" खरे तर गाणे मला खूप काही आवडत नाही. पण थीम मध्ये बसले म्हणून टाकले. हे सर्व करता करता ५ वाजायला आले आणि जाम भूक लागली. गरमागरम पोहे खायला केले. आणि नंतर आज घेतलेली फुले अपलोड केली. फुले नहेमीच खूप आनंद देवून जातात. प्रत्येकाची फुलण्याची तऱ्हा काही वेगळीच असते. आज पाऊस असल्याने त्यावर पावसाचे थेंब पडले होते त्यामुळेही ही फुले जास्त सुंदर दिसत होती. बऱ्याच फुलांचा झाडाखाली सडा पडला होता. काही झाडावरच कोमेजून गेली होती तर काही खाली पडलेली कोमेजली होती. ही अशी सुकलेली फुले पण किती छान दिसतात. त्यांचे सौंदर्य तर वेगळेच असते.
आज दिवसभर पाउस पडत आहे. उद्या आणि परवा तर जास्तच आहे. आज खरे तर मी दही बटाटा पुरी करणार होते, पण ती उद्या करीन. त्यात तयारीमध्ये खूप वेळ जातो.

9 comments:

Anonymous said...

Rohini Taai, me yeu ka SPDB khaayla? :-) Maala khup avadte! Kashya ahaat tumhi? Khup divasani ithe ale, khup chaan vatla tumchi dinacharya vachun. Phulacha photo kitti sundar khadla ahet tumhi. Ka ho kantala ala tumhaala photography cha? Itke chaan chaan photo kadhta tumhi!

'Diwana hua baadal' majha hi agdi all time favorite gaana ahe! Me kaal-parvaach gun-gunaat hote. Javed Akhtar cha ek program pahat hote tyaat tyaane Rafi chi gaani anhi tyancha gaanyacha pravaas itka kahi sundar saangitlay. Tumhi pahilay ka ha program? Tumhaala nakkich khup avdel.

- Priti

Pallavi Sameer said...

are wa. aaj sahaj aale tar navin bhag.. chan..
check out my blog "hitaguj" rohini
http://hitagooja.blogspot.com/

-Pallavi

rohinivinayak said...

pallavi aani priti,, tumhi maza blog vachta aani abhipray pan lihita tyamule mala khup mhanje khup utsah yeto, konitari aaplyabarobar aahe ase vatate, aadhar vatato, thanks,

priti, kuthe gayab jhali hotis? kashat busy hotis? tuza savisttar abhipray vachun khupach chhan vatle ga mala ! thanks,

Anonymous said...

Aho kaahi vicharu naka! Ikaa kaam vadhlay, itki adkun gelye me ki kahi avadichya savai haathun sutlyayt. Mag asach achanak haathi thodasa mokla vel yeto anhi maala kaay karu- kitti karu kaahi suchaatach nahi. Ikaa kaahi karaycha asta ki vel kami padto. Kadhi kadhi vatta ayusha asach dhavaat-palaat kasa-kuthey jaatay kahi kalaatach nahiye, athvaani kami - rojachi dhavpal jasta!

- Priti

rohinivinayak said...

:) yahi hai jingadi

Anonymous said...

Yeh jeevan hai, Is jeevan ka
yahi hai, yahi hai, yahi hai raangroop... :)

Bara maala saanga, tumhi toh program pahilay ka Javed Akhtar cha? Me link dete tumhi nakki paha, khup avdel tumhaala.

http://www.youtube.com/watch?v=ZXIxW6q14Yo

Link var kahi karananey ali nahi tar Javed Akhtar Rafi asa search kara.

- Priti

rohinivinayak said...

masta aahe ! thanks for link.

Sanket Patil said...

छानच आहे फुल..कधीही ना पाहिलेले..कसले आहे हे..
मलासुद्धा फोटोग्राफी फार आवडते..हा माझा ब्लॉग. .aabhal.blogspot.com

rohinivinayak said...

sanket patil,, pratisadabaddal anek dhanyawaad, phul konte te mahit nahi.