Friday, December 31, 2010

शुभेच्छा...२०११


मागच्या वर्षीपासून काहीतरी वेगळे करायचे ३१ डिसेंबरला असे ठरवले आहे. मागच्या वर्षी २००९ ची संध्याकाळ होती. आकाशात पक्षी उडत होते त्याचा एक फोटो घेतला होता. यावर्षी दोन शुभेच्छा पत्र तयार केली. माझी मैत्रिण सध्या अल्जेरियाला असते. ती दोघे व आम्ही दोघे ५-१० मिनिटांची अंताक्षरी खेळुया असे ठरवले. मजा आली. थोडक्यात काहीतरी मजा. बघू आता पुढच्या वर्षी ३१ ला काय होते ते. तसे तर पूर्वीच्या काही काही आठवणीही आहेत. काही आठवतात, काही नाही.‎"२०११" म्हणजे सुखशांती, आनंद, भरभराट, समृद्धी, चैतन्य, आशा, चिरतारूण्य, समाधान, उत्कर्ष!!!! नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!!


http://rohinivinayak.mypodcast.com/2010/12/online_antaxari-337419.html

No comments: