Thursday, November 26, 2015

२६ नोव्हेंबर २०१५

आजचा दिवस हवेसाठी खूपच छान होता. कमी थंडी, स्वच्छ सूर्यप्रकाश होता आणि म्हणूनच आम्ही ग्रीनवीलला जायचे ठरवले. जातायेता प्रवास सुखाचा झाला. रस्ते ओसाड होते कारण की आज Thanksgiving अमेरिकन लोकांचा सण. black friday करता संध्याकाळपासून गर्दी सुरू होणार.  इंडियन गोसरी आणि इंडियन जेवण असे ठरवल्याप्रमाणे झाले. आरामात उठलो. उठून व्यायाम केला. हल्ली गुरवारचा दिवस डोक्यावरून अंघोळीचा ठेवला आहे. याला कारण म्हणजे मला सध्या नोकरी लागली आहे. आणि दर आठवड्याचे कामावरचे दिवस बदलत रहातात.



आज दोघांनाही सुट्टी आहे आणि हवाही चांगली आहे म्हणून लगेचच बाहेर जायचा निर्णय घेतला. त्यात मला आजच सुट्टी आहे. विनायकला मात्र चार दिवस लागून सुट्टी आहे. नवीन नोकरीचा वेगळाच अनुभव आहे. तो मी लिहिणार आहेच. आज त्यातल्या त्यात निवांत वेळ मिळाला म्हणून रोजनिशी लिहीत आहे. काल खूपच थंडी होती. नोकरीवरून येताना चालत येते. खूप दमायला झाले होते. काल भाजणीची थालिपीठे जेवायला केली. आज रात्रीही कालच्या पिठाची उरलेली थालिपीठे आणि पटकन होणारी फ्रोजन बीन्सची उसळ करणार आहे. हल्ली आमच्या दोघांचा डबा मी रात्रीच करून फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे रात्रीचे जेवण व उद्याचा जेवणाचा डबा असा एकच मेनू असतो.


आज इंडियन उपहारगृहात छान पदार्थ होते. वडा सांबार, खेकडा भजी, मसूराची उसळ, कांदे वांग परतलेली भाजी आणि बिर्याणी छान होती‌. शिवाय नेहमीच्या ठरलेल्या इंडियन भाज्या इंडियन स्टोअर्स मधून घेतल्या. खारी, खोबरे, काजुकतली, बिस्कीटे, फरसाण हेही आवडीचे घेणे झालेच. नवीन शहरात आल्याने आम्हाला इंडियन भाज्या खायला मिळतात त्यामुळे चांगले वाटते. साधारण महिन्यातून एकदा जाणे होते, हेही नसे थोडके !

इंडियन मिरच्या आणि कढिपत्ता आणता येतो त्यामुळे पोहे आणि उपमे जास्त चवदार बनतात ! आज आलेही आणले आहे. तेही चांगलेच असेल. इंडियन चविष्ट भाज्या खाताना खूप छान वाटाते. गवार, तोंडली, कारली, घेवडा, भरल्या वांग्याला वापरता येणारी छोटी वांगी त्यामुळे पुढचा आठवडा भारतीय भाज्यांचा !



7 comments:

इंद्रधनु said...

नवीन नोकरीबद्दल अभिनंदन :)

MePriya said...

म्हणजे रात्रीचे जेवण व उद्याचा जेवणाचा डबा असा एकच मेनू असतो....

nice!

rohinivinayak said...

hi Dhanu,,, thank you very much !! mepriya,, ho, doghehi nokri kartana asech karave lagte,, karan ithe bhandi pan ghasayla lagtat na,, tyamule,, barech jan lunch la bread netat,, ithe udyachya sakalchya angholi pan adlya shivshich urkatat :) :) thanks for abhipray !

Anonymous said...

Rohini Taai, navin nokri baddhal tumche khup khup abhinandan!!
Me gharatun sakali 6:30 la nighte mhanun me pan ratrichich bhaaji dabbyat nete fakta polya, nashta anhi chaha sakali banavte. weekends la matra vel pan asto anhi energy pan so vel lagnare avdiche padartha banavte. maala upyogi padleli ek tip mhanjey me muter paneer, choley, rajma kivva raasa aslelya usali kelya ki tya jasta pramanat banvun thodya freeze karte, jar kahi karanani me jevan banvu shakle nahi kivva khup thakun gele tar tya agdi upyogi padtat anhi chaav ajibat badlat nahi, microwave madhye defrost hoi paryanta cooker madhye bhaat kivva pulao tayyar hoto. Ankhi ek, jar pudhe tumcha pan schedule khup busy jhala anhi ghari yeyla majha sarkha ushir hot asel tar InstaPot navacha electric pressure cooker me recommend karen. Me hyaat varan bhaatacha cooker (kivva khichadi, daal, pattal bhaaji, etc.) lavun nighte anhi timer asa set karte ki me ghari alya alya pressure padto anhi garam garam varan bhaat tayyar asto, no waiting or heating time. Me saangu shakat nahi ki hyacha maala kitti upyog jhaalay!

- Priti

rohinivinayak said...

हाय प्रीती,, तुझा सविस्तर प्रतिसाद वाचून खूप छान वाटले गं !! अभिनंदनाबद्दल सर्वांचेच आभार ! मी इथे अमेरिकेत २ च नोकऱ्या केल्या. आता ही लागलेली आणि २००३ मध्ये डे केअर आणि चर्च मध्ये केलेली नोकरी. भारतात असताना कंपनीमध्ये लग्ना आधी आणि लग्नानंतर मिळून ८ वर्षे नोकरी केली. खरे तर मला नोकरी करायला आवडत नाही. नोकरी या विषयावर मी एक लेख लिहिणार आहेच. मी गरजेपुरतीच नोकरी केलेली आहे. आणि प्रत्येक नोकरीचा वेगळा अनुभव आहे. आताची नोकरी पण खूपच वेगळी आहे. त्यावरही लिहिणार आहे. अमेरिकन ग्रोसरी स्टोअर्स मध्ये सध्याची नोकरी लागली आहे. खूप दमायला होत आहे आणि लिहिण्यासाठी अजिबात वेळच नाहीये. अर्थात लिखाण , फोटोग्राफी आणि रेसिपीज वगैरे खूप झाल्याने त्याचाही मला कंटाळा आला आहे आणि म्हणूनच ही नोकरी करायची असे ठरवले. फोटोग्राफी २००१ पासून सुरू केली ती आता माझ्या अंतापर्यंत सुरूच राहील. रेसिपी आणि बाकीचे फुटकळ लेखन जितके करावे तितके थोडे आहे ! लेखनाची सुरवात २००५ पासून सुरू झाली आणि एकूणच या सर्व गोष्टींचा मी मनमुराद आनंद लुटला आहे.


मी सर्व वाचकांचे आणि भरभरून अभिप्राय देणाऱ्यांचे आभार मानते. आपण लिहिलेले कुणीतरी वाचत आहे आणि अभिप्रायही देत आहे, यामुळेच तर उत्साह वाढतो आणि अजून काहीतरी सुचलेले लिहावेसे वाटत राहते. तुम्हां सर्वांमुळेच माझे मन खूप आनंदी राहते ! अनेक अनेक धन्यवाद!!


Anonymous said...

Maala tumche lekh vachayla khup avadtat, asa vatta eka khup javalchya maitrinicha patra vachtye. :-) tumchya goshinchi tar me fan ahe! tumhi junya athvani lihilya ki maala agdi saagla kaam sodun tya vachavyashya vattat. Kharach lihit raha tumhi adhun-madhun ka hoi na.

- Priti



rohinivinayak said...

ho priti, nakkich lihit rahin,, tu 6.30 la job karta baher padtes? aani ghari pan ushirane yetes, bap re ! khup damat asashil na ! ithe job karne khup hectic aahe ghar aani mule sambhalun ! tula maza salam !