Hi
Jennifer, how are you? I am good! how about you? I am fine ! जेनिफर
तिच्या धोपटीतून जाडे पुस्तक बाहेर काढते आणि मला विचारते, धड्यातले कोणते
पान चालू आहे? ते पान मी तिला दाखवताच आम्ही दोघी एकमेकींकडे बघत
स्मितहास्य करतो. मी तिला हळू आवाजात विचारते की या टॉपिकवरची परीक्षा
येत्या शुक्रवारीच आहे ना? ती म्हणते yes!
करीन यांचे रोलकॉल घेणे संपते आणि एक बाई विचारते की मला डी. सी. ला जायचे आहे, परीक्षा नंतर ठेवाल का? करीन म्हणतात "No!" you can give exam on Monday! 1०० पानांच्या धड्यावर परीक्षा आणि एक भलामोठा गृहपाठ एकत्रच आले होते. करीन यांनी परीक्षा पुढे ढकलली नाही तेच बरे झाले कारण की अभ्यास चुकत नाहीच, शिवाय परीक्षा पुढे ढकलल्याने फायदाही होत नाही कारण त्याच्या पुढची परीक्षा लागलेलीच असते. तो गृहपाठ खूपच मोठा होता. पाने प्रिंट करून मोठा गठ्ठा तयार झाला होता की जो मोठ्या स्टेपलरनेही स्टेपल करता येत नव्हता. म्हणून मी एका मोठ्या एनव्हलपमध्ये तो गठ्ठा घातला आणि गृहपाठ दिला. गृहपाठ असा होता की ती व तो प्रेमात पडतात आणि लग्न करतात. त्यांना मुले होतात, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी अज्ञान आणि मुलगा सज्ञान. तिला एक पुरूष आवडायला लागतो आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचे प्रेम प्रकरण चालू होते. आपल्या बायकोचे कुणाबरोबर तरी प्रेम प्रकरण चालू आहे हे कळल्यावर तो खूप चिडतो. त्यांच्यात बरेच वादविवाद चालू होतात. ते इतके विकोपाला जातात की नवरा दारू पिऊन बायकोला मारायला लागतो. ती तुमच्या ऑफीसमध्ये येते आणि तिची सर्व स्टोरी सांगते. आणि आता काय करावे याचा सल्ला तुम्हाला विचारते. या गृहपाठामध्ये करीन यांनी सर्व प्रकारच्या कागदपत्रांचे ड्राफ्टिंग सांगितले होते. शिवाय कोर्टातले सर्व फॉर्म डाऊनलोड करून तेही भरायला सांगितले होते. गुगलींग तर करावे लागतेच. गुगलमध्ये सर्व काही मिळते. नशिबाने दुसऱ्या विषयाचा गृहपाठ व परीक्षा नव्हती ! करीन यांचा वर्ग संपल्यावर मी जेनिफरला म्हणाले see you tomorrow ! फॉल सेमेस्टरच्या एका विषयाला जेनिफर व माझी ओळख झाली. Clarke बाईंनी जेव्हा पहिल्यांदा रोलकॉल घेतला तेव्हा माझे नाव पुकारल्यावर पुढे बसलेल्या जेनिफरने मागे वळून माझ्याकडे पाहिले व हासली. मीही हासले. दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण सेमेस्टर होईपर्यंत ती माझ्या शेजारीच बसायची. स्प्रिंग सेमेस्टरला योगायोगाने परत एकदा आम्ही दोघी एकत्र आलो ते करीन यांच्या वर्गात आणि त्या सेमेस्टरला सुद्धा ती जेनिफर रॅलीला राहते, म्हणजे ती तिच्या आईवडिलांसोबत तिथे रहायची. पण आता शिक्षणासाठी म्हणून आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत ती विल्मिंग्टनला राहते. तिने तिच्या साखरपुड्याची अंगठी मला दाखवली आणि म्हणाली येत्या ऑक्टोबरला आम्ही दोघे विवाहबद्ध होत आहोत. एकदा असे झाले की एका टेस्ट मध्ये True or False मध्ये एक वाक्य बरोबर होते ते करीन यांनी चूक दिले होते. पेपर मिळाल्यावर आम्ही दोघींनीही एकमेकींच्या पेपरामध्ये डोकावले आणि बोललो हे वाक्य बरोबर आहे. चूक कसे काय? जेनिफर मला म्हणाली आज मी पुस्तक आणले नाहीये तर तू विचार ना करीन यांना. मी हात वर केला आणि सांगितले की हे वाक्य बरोबर आहे. करीन आमच्या टेबलापाशी आले. त्यांनी ते वाक्य वाचले आणि म्हणाले की चूकच आहे. मी पुस्तकामधला पॅरा त्यांना दाखवला. तरीही ते चूक म्हणाले. आम्ही दोघी कसे काय शक्या आहे? अश्या प्रश्नार्थक नजरेने एकमेकींकडे पाहिले. मग मी करीन यांना त्या वाक्य कसे बरोबर आहे याचे थोडे स्पष्टीकरण दिले. पुढच्या बाकावरची बाई म्हणाली what she says is correct, मग करीन यांना ते पटले असावे आणि म्हणाले ओके! आणि त्यांनी आम्हाला दोघींनाही त्या प्रश्नाचे मार्क देवू केले ! क्रमश :.... |
Monday, August 31, 2015
CFCC - North Campus - Wilmington - NC - (3)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment