Saturday, August 08, 2015

८ ऑगस्ट २०१५





आजचा दिवस खूप भरगच्च गेला. आज वि ला ऑफीसला जायचे होते, थोडे काम होते. म्हणून आमच्या दोघांची वरात बरोबर १२ वाजता निघाली. एके ठिकाणी थोडे काम होते ते केले. नंतर ऑफीसच्याच रस्त्यावर एक मेक्सिकन उपहारगृह आहे तिथे जेवलो. नंतर ऑफीसमध्ये वि ने २ तासांचे काम उरकले.





तसे मला अजिबातच बोअर झाले नाही कारण की मी ऑफीसच्या बाहेरच्या आवारात सफरचंदाच्या झाडाखाली एका बाकड्यावर बसले होते. हे सफरचंदाचे झाड आहे बाजूच्या जंगलात, पण त्याच्या फांद्या मात्र ऑफिसच्या आवारात अगदी जमिनीला टेकतील इतक्या वाकलेल्या आहेत. त्यावर बरीच सफरचंद लटकलेली दिसली आणि बाकड्याच्या आजूबाजूला सफरचंदांचा सडा पडलेला होता. त्यातली बरीच वाया गेलेली दिसत होती. विनायकचे ऑफीसमधले काम उरकले व त्यानंतर एका जंगलात जायचे ठरवले होते तिथे गेलो. वळणावळणाचे रस्ते पाहून डोके उठले होते. तिथला एक धबधबा दुरूनच पाहिला कारण की घरी परतायचे होते. ६ ला घरी परतलो आणि चहा घेतला. उन्हामुळे डोके पण दुखत आहे. शिवाय धबधबे बरेच लांबवर असतात ! तिथे जायला कमीतकमी १ मैल तरी वर खाली वळणे घेत चालावे लागते. यापुढे जेव्हा जाऊ तेव्हा धबधब्याच्या पायथ्याशी उतरून धबधब्यात पाय सोडून निवांतपणे बसणार आहोत. तिथे अजून ५ ते ६ धबधबे आहेत. हा धबधबा इतका काही छान आहे की खडकावरून पांढरे शुभ्र दूध वाहत आहे असेच वाटते !




सफरचंदाच्या फांद्या वाकून खाली बाकड्यावर छान सावली आहे. इथे वि व त्याचे मित्र मध्यल्या जेवण्याच्या  सुट्टीत जेवायला बसतात. झाडाखाली सावलीत बसून जेवण , किती छान ना ! नुकतेच आम्ही नॉर्थ कॅरोलायना राज्यातच पूर्वेपासून पश्चिमेकडे प्रयाण केले आहे. या आधी सपाट प्रदेश, समुद्रकिनारा आणि नदी होती. नवीन ठिकाणी डोंगरच डोंगर आहेत ! घसरगुंडीसारखे आणि वळणावळणाचे रस्ते आहेत. आजुबाजूला जंगल आणि पर्वतरांगा आहेत. खूप छान निसर्गरम्य प्रदेश आहे. सध्या आम्ही निसर्गाचे वेगळे रूप अनुभवत आहोत.

8 comments:

Mr.Ashok Dalvi said...

liked

rohinivinayak said...

Thank you !

Anonymous said...

Nice !! please post some photos of road / waterfall

rohinivinayak said...

yes, Anonymous ! thanks for comment !

SAVITA said...

masta. tithle photo tak ga rohinitai

rohinivinayak said...

mazya youtube channel chi link ya blog var right corner var aahe ti paha ga savita and all ! Dear all,,thanks a lot for compliment !

mannab said...

आपण लिहिलेल्या या सफरचंदाच्या झाडावरून माझी बॉस्टनच्या मुक्कामातील एक आठवण जागी झाली. गेल्या ४ वर्षात दोनदा आम्ही दोघे आलो होतो आणि दररोज तेथील वसाहतीत फेरफटका मारत असू. दुतर्फा विविध घरांच्या मधोमध वॉक वेवरून जाताना डावीकडील घर क्रमांक ५६ च्या अंगणात तीन सफरचंदाची झाडे जवळ जवळ उभी दिसायची आणि त्या तिन्ही झाडांना सफरचंदे लगडलेली असायची. काही फळे तर झाडावरच पिकून मग गळून खाली पडायची. कोणीही त्यातील फळ उचलून नेत नसे.तसेच झाडावरील फळे काढीत नसे. हा तेथील लोकांचा स्वभाव म्हणा किंवा चांगुलपणा आहे. गेल्या वर्षी आलो असतांना एकदा वादळ होऊन मधले झाड उन्मळून पडले. बरेच दिवस त्याची मधली पोकळी जाणवत असे. पण बाकीच्या दोन झाडांवर तशीच सफरचंदे लगडलेली होती. आज ते सारे आठवले. त्या झाडांचा फोटो मी काही घेतला नाही. घेतला असता तर या सोबत पाठवला असता. धन्यवाद.
मंगेश नाबर

rohinivinayak said...

tumchi aathvan chhan ch aahe ! photo asta tar ajun chhan vatle aste, aso, thanks for pratisad!