Thursday, January 15, 2015

अघटित - भाग १

मानसीचे पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी ती बाळबोध वळणाची असते.  तिचा  भूताखेतांवर, भविष्यावर आणि अशा काही घटनांवर की ज्या घडलेल्या आहेत, ज्यात विपरीत काहीतरी आहे, या सर्वांवर तिचा विश्वास असतो. मानसी मॉड आहे. तिचा पेहराव म्हणजे स्कर्ट आणि टॉप. बॉयकट शिवाय तिला दुसरी कोणतीही केशभूषा पसंद नाही. दागदागिने, साड्या घालून मिरवावे असे तिला कधीच वाटत नाही.




एका जीममध्ये अमित व तिची ओळख होते. अमित काही महिन्यांच्या प्रोजेक्टकरता भारतात आलेला असतो. अमितलाही जीममधल्या वेगवेगळ्या मशीनवर जाऊन व्यायाम करण्याची आवड असते. एक मुलगी जीममध्ये येऊन व्यायाम करते आहे याचे त्याला खूप कौतुक वाटते आणि तो तिची ओळख काढतो. कुठे राहतेस, काय करतेस अशी विचारणा करतो. तिला ही तो आवडतो. मग त्यांच्या व्यायामाविषयी चर्चा सुरू होतात. त्या दोघांना गाण्याचीही आवड असते. त्याला मात्र वेस्टर्न म्युझिकच आवडत असते.  तिची आवड मात्र मराठमोळी. इतकी मॉड असूनही हिला मराठी गाण्याची आवड कशी काय याचे त्याला आश्चर्यच वाटते. हळूहळू त्यांची मैत्री वाढते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. एके दिवशी तर अमित बाँबगोळाच टाकतो. त्याचे असे होते. काही कारणानिमित्ताने जीम बंद असते आणि ते दोघे आता काय करायचे अश्या विचारात असतात. तो म्हणतो चल आपण या उपहारगृहात कॉफी घेऊ. ती म्हणते कॉफी नको. मला चहाच आवडतो. तो म्हणतो बरे चहा तर चहा.
आणि चहा पितानाच तो तिला लग्नाची मागणी घालतो. लग्नाची मागणी घातल्यावर ती खूपच सुखावून जाते. खरे तर त्याला जीममध्ये बघताक्षणीच ती त्याच्या प्रेमात पडलेली असते. दोघांच्या घरातून लग्नाला परवानगी मिळते आणि धुमधडाक्यात लग्न पार पडते. अमितची अमेरिकेत निघायची वेळ येते. मानसीलाही त्याच्याबरोबरच जायचे असते. पण त्याच्या आग्रहाखातर ती तिच्या आईवडिलांकडे राहते. एका महिन्यानंतर लगेचच ती अमेरिकेला जाण्याच्या तयारीला लागते. आईबाबा आणि सासूसासरे यांचा निरोप घेऊन ती मुंबईच्या विमानतळावर येते.


अमेरिकेतल्या एका मोठ्या विमानतळावर ती उतरते आणि तिची नजर अमितला शोधू लागते. अमित तिला लांबूनच हाय! असा हात करतो आणि ती अमितच्या कारमध्ये येऊन बसते. दोघेही घरी येतात. मोठ्या बंगल्यात अमितने तिच्या स्वागताची जोरदार तयारी केलेली असते. बेडवरच्या चादरी स्वच्छ धुवून अंथरलेल्या असतात. डायनिंगवर गरम गरम अन्न तयार असते. अर्थातच ते एका हॉटेलमधून मागावलेले असते. मोठमोठ्या बॅगा घेऊन ते दोघे आत येतात. घरात शिरल्यावर मानसीला एकदम रडायलाच येते. अमित म्हणतो काय गं झालं? अगं तू तर माझ्याबरोबरच यायला उत्सुक होतीस ना? मग , आता काय झाले? "काही नाही रे. आईबाबांची आठवण आली मला. पण तू मला त्यांच्याकडे रहायला सांगितलेस ते किती बरोबर होते ते आता पटतयं मला. " अमित म्हणतो "हो ना? चल मग. पटापट आवरून जेवायला ये.


मानसी जागी होते तेव्हा सकाळ उलटून गेलेली असते. ती पटकन उठते. अरे बापरे! आपण किती वेळ झोपलो आहोत? असे म्हणून अमितला हाक मारते. खाली येऊन बघते तर खाली कुणीच नसते. अरेच्या अमित कुठे गेला? घड्याळात पाहते तर जवळजवळ ११ वाजत आलेले असतात. तेवढ्यात अमितचा फोन वाजतो. उठलीस का? " मानसी म्हणते " हो अरे, किती वेळ झाला मी झोपेतून जागे होण्यासाठी ! आणि तू कुठे आहेस? " अगं कुठे आहेस म्हणजे काय? ऑफिसमध्ये नाही का? चल, मी येतो संध्याकाळपर्यंत.


दिवसभर मानसी भारतातून आणलेल्या बॅगा खाली करते. खाण्याचे विविध प्रकार ती कोणत्या ना कोणत्या डब्यात भरून ठेवते. नंतर छानसा स्वयंपाकही करते. अमित घरी येतो आणि ते दोघे मिळून मस्त जेवण करतात. रात्री झोपताना अमित मानसी खूप विषयांवर बोलतात. लग्नानंतर पहिल्यांच असा निवांतपणा त्यांना मिळालेला असतो. विकेंडचे कार्यक्रम आखतात. कार्यक्रम आखताना मानसी अमितला म्हणते "आपण समुद्रावर कधी जायचे? अमित म्हणतो अगं इथून समुद्र तसा दूर आहे. चारपाच तास लागतात. आपण एखाद्या लॉंग विकेंडचा प्लॅन बनवून समुद्रावर जाऊ. मला माहीत आहे तुला समुद्र किती आवडतो ते. हो. रे मला खूप म्हणजे खूपच आवडतो समुद्र आणि आता तर अमेरिकेतला समुद्र पाहण्याची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे मला ! ए. कधी जायचे सांग ना !


अगं हो हो. थोडा धीर धर. सध्या कामाचे वर्क लोड खूप आहे. पण मी तुला सांगतो, येत्या ६ महिन्याच्या आत आपण नक्किच जाऊ. काय! सहा महिने ! मानसी भुवया उंचावते. चला मॅडम, झोपा आता. किती वाजले पाहिलेत का? रात्रीचे ३ वाजत आले. तुझी झोप झाली आहे पण उद्या मला कामावर जायचे आहे. उद्यापरवा विकेंड आहे तेव्हा जवळच कुठेतरी फिरायला जाऊ. चल, गुडनाईट.

त्यादिवशी रात्रभर मानसी समुद्राचीच स्वप्ने पाहत असते. स्वप्नात तिला समुद्राच्या लाटा इकडून तिकडे धावताना दिसतात. खूप दूरदूरवर लाटांकडे बघताना काळोख होतो आणि ती घाबरून उठते. मानसीला जितका समुद्र आवडत असतो तितकीच त्याची भीतीही वाटते असते.



क्रमश : -----

7 comments:

मन कस्तुरी रे.. said...

वा वा रोहिणीताई...एकदम भयकथा.....!
ण तुम्ही वर्तमान काळात का लिहीता...?

Anonymous said...

Rohini Taai, khup divasani navin goshta lihitay :-) me khup utsukt ahe pudhe kaay hota te vachaayla. Tumhaala navin varshacha khup khup shubechcha!

- Priti

Anonymous said...

पुढील भाग कधी वाचायला मिळेल ? हि कथा तुमच्या वैयक्तिक जीवनावर आधारित आहे असे वाटते ...

rohinivinayak said...

Aambat goad,, thanks for reply, mi katha lihinyacha prayatna kartye, ek katha lihili aahe, katha label madhe milel, ti ardhi purNa jhali aahe,

Priti , tu nehmich utsuk astes maze lekhan vachnyakarta, he pahun khup chhan vatate mala, tula suddha navin varshachya hardik shubhechcha ! and thanks for the reply.

Anonymous, thanks for reply ! hi katha purNapane kalpanik aahe, pudhcha bhag lihinch lavkar, sadhya mi jara busy aahe tyamule kadachi uthir hoil,

Thanks so much Everyone !

Anonymous said...

Waiting for next part.....please. hurry up....

Anonymous said...

पुढच्या भागाची वाट पाहतोय

rohinivinayak said...

Anonymous, thank you very much for your comment !! yes, tumha sarvanna utsutka aahe he pahun kharch khup chhan vatle, pan kathechya babtit kaay hote ki man purnapane tya goshttat astanta patapat lihile pahije, tar te khare changlya ritine utarate, tyamule mi lavkar lihinyacha nakkich prayatna karen, hi katha lihayla 1 varsh jhale, te mala madhe likhan milale, te ardhech hote, te mi blog var utaravle, pan mi nakkkiich try karin, thanks a lotttt :)