Tuesday, July 03, 2012

२०५ इगल ड्राइव्ह

२२ मे २००१ रोजी संध्याकाळच्या सुमारास आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. या अपार्टमेंटच्या शेजाररच्या अपार्टमेंटमध्ये एक भारतीय कुटुंब राहत होते. आमच्या अपार्टमेंटचा नंबर होता २०५ आणि शेजारी २०६ होते. ईगल ड्राइव्ह नावाचे हे अपार्टमेंट विद्यापीठाच्या चालण्याच्या अंतरावर होते. २०५ नंबरच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही फक्त ८ दिवसच राहणार होतो. त्यानंतर आम्ही २०६ मध्ये जाणार होतो. तसे म्हणायला गेले तर २०६ हे आमचे अमेरिकेत आल्या आल्या महिन्याभराच्या आत तिसर स्थलांतर ! २०५ मध्ये आल्यावर अमेरिकेतल्या घरी राहण्याची सुरवात झाली.






२०६ मध्ये तमिळ कुटुंब राहत होते. ति मैत्रिण मला म्हणाली आज रात्री तुम्ही आमच्याकडेच जेवा, दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या घरात तुमचे नवीन रुटीन सुरू करा. त्यादिवशी रात्री आयते जेवण मिळाले ते एका दृष्टीने बरेच झाले. नवीन घरात रात्री काही करायला उत्साह नसतोच. त्या कुटुंबात एक शाळेत जाणारी मुलगी होती. तिथे जेवायला गेलो तर ती मुलगी माझ्या मांडीवर येऊन बसली. मला खूप छान वाटले. तिने जेवणही छान बनवले होते. पोळी भाजी बरोबर तिने डोसाही बनवला होता. तसे अमेरिकेत आल्यावर ८ दिवस आम्ही प्रोफेसरांच्या बंगल्याच्या शेजारच्या छोट्या बंगल्यात राहत होतो पण तिथे भारतीय जेवण नव्हते. त्यामुळे या मैत्रिणीच्या घरी घरचे छान जेवण जेवल्यावर बरे वाटले. जेवण करून घरी आलो. पिवळ्या बल्बमधले मिणमिणते दिवे आणि जागेमध्ये एकही फर्निचरचा तुकडा नाही. हे अपार्टमेंट फर्निश्ड नव्हते. इथल्या अपार्टमेंटमध्ये दोन प्रकार असतात एक तर फर्निचर असते नाहीतर अजिबात नसते. फर्निचर जरी असले तरी ते बरेच जणांनी वापरून जुनाट झालेले असते.






झोपायचे होते पण गादी नव्हती. या घरात रहायला येण्या आधी प्रोफेसर ऍलन मर्चंड यांनी आम्हाला सॅम्स क्लबमध्ये नेले होते. सॅम्स क्लब हे अमेरिकेतले अवाढव्य दुकान आहे. इथे घाऊक माल विकत घ्यावा लागतो व वर्षाचे पैसे एकदम भरून त्या दुकानाचे सदस्यत्व घ्यावे लागते. इथे आम्ही काही गरजेच्या वस्तू खरेदी केल्या. त्यात ५० किलो तांदुळाचे पोते व २० किलो मैदा घेतला. मैदा म्हणजे ऑल परपज फ्लोअर. हवा भरून तयार करता येईल अशी एक गादी घेतली. त्या गादीत हवा भरून ती फुगवली व त्यावर भारतातून आणलेल्या दोन चादरी घालून झोपलो. उशाला काही नव्हते. झोप येता येत नव्हती. आपण इथे फक्त दोघेच्या दोघेच आहोत याचा एकाकीपणा खूप जाणवत होता. भारताची आठवण येत होती.






दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जवळच असलेल्या दुकानातून चहा, साखर, तेल, कांदे बटाटे, भाज्या, टुथ ब्रश, टुथपेस्ट, साबण असे सर्व काही आणले. इलेक्ट्रीकच्या शेगड्या, अरूंद स्वयंपाकघर, मिणमिणते दिवे, अंघोळीकरता अरूंद टब सर्व काही नवीनच होते. अंघोळ करताना तर सुरवातीला छोटी बादली व त्यात एक ग्लास टाकून भारतात अंघोळ करतो तशी केली. शॉवरचे पाण्याने केस ओले न होता अंघोळ करायला एक दोन दिवसातच जमवले. फक्त मला इथले एक आवडले ते म्हणजे गरम व गार पाणी दोन्ही होते. त्यामुळे मनसोक्त अंघोळ करता येत होती. इलेक्ट्रीकच्या शेगडीवर चहाला लागणारा वेळ, कूकरला लागणारा वेळ हे काही पचनी पडत नव्हते. सुरवातीला जवळ जवळ १५ दिवस आम्ही मैद्याच्या म्हणजेच ऑल परपज पीठाच्या पोळ्या खात होतो. पोहे उपमे याची तीव्रतेने आठवण येत होती. संध्याकाळी विनायक लॅबमधून घरी यायचा तेव्हा खायला काय करायचे याचा प्रश्न पडत होता. सुरवातीला बटाट्याची भजी मैदाच्या पीठात बुडवून तळली.






सॅक अँड सेव्ह हे आमचे अमेरिकेतील पहिले दुकान जिथे आम्ही गोसरी आणण्याकरता सुरवात केली. ग्रोसरी हा शब्दही इथे आल्यावरच कळला ! कळला म्हणजे वाण्याचे सामान, भाजीपाला, दूध व इतर काही घेण्याकरता जिथे जायचे ते म्हणजे ग्रोसरीला जायचे ! फोडणीसाठी मोहरी हिंग हळद शेजारचीने दिले. मुंबईत असताना मी वाण्याची यादी फोनवरून सांगत होते. दोन तासात सामान घरपोच. शिवाय दूध, पेपर घरपोच. नंतर कामवाली येऊन सगळे कामही करून जाते. केराचा डबा घराबाहेर ठेवला की झाले. इथे सर्व विरूद्ध. सर्वच्या सर्व कामे आपणच करा. इथल्या दुकानामध्ये सुरवातीला आपल्याला लागणाऱ्या वस्तू व सामान कुठे ठेवले आहे हे सापडवायलाच वेळ लागतो इतकी इथली दुकाने मोठी असतात. या दुकानामध्येच मग सुरवातीला संध्याकाळच्या खाण्यामध्ये केक, चीप्स व आयस्क्रीम आणायला लागलो. मल्टीग्रेन नावाचा ब्रेड आणून तो कॉफीत बुडवून छान लागायचा.





सवयीप्रमाणे केराचा डबा दाराबाहेर ठेवला. नंतर कळाले की कचरा आपला आपण रोज कचरापेटीत टाकायचा असतो. कामवालीची गैरहजेरी तर खूपच जाणवत होती. या आठ दिवसामध्ये दिवस जाता जात नव्हते. एक दिवस मावळून दुसरा दिवस येईपर्यंत असे वाटायचे की खूप काळ लोटला आहे जणू! सुरवातीला भारतात फोन नाही, टीव्ही नाही, फर्नीचर नाही, वाचायला पुस्तके नाहीत. शेजारी व आमच्या खाली एक असे दोन भारतीय कुटुंबे राहत होती पण त्यांच्याकडेही पटकन उठून जावे असे मनात येऊनही जाता येत नव्हते. संभाषणही इंग्रजीमध्येच कारण की त्या दोघींना हिंदी बोलता येत नव्हते त्यामुळे बोलायचे पण समाधान होत नव्हते. आम्ही दोघे मराठीतून बोलत होतो त्याचाच मला खूप आधार वाटत होता. भारतातल्या सर्व सुखसोयी सोडून इथ उगाचच आलो असे वाटायला लागले. कोणीतरी शिक्षा केल्यासारखेच वाटत होते. त्यातल्या त्यात एक होते की विनायक दुपारी जेवायला घरी येत होता त्यामुळे स्वयंपाकात वेळ जायचा व संध्याकाळी चहाला आला की परत लॅब मध्ये सुरवातीच्या आठ दिवसात तरी गेला नाही.






संध्याकाळी मराठी बातम्या टीव्हीवर पाहण्याची खूप सवय होती तेही खूप जाणवत होते. गॅलरीत उभे राहून परत घरात यायचे. घरात आले आणि एखाद्या कार येण्याचा आवाज आला की लगेच परत बाहेर यायचे. असे वाटायचे की आपल्याकडेच कुणीतरी आले आहे. २०५ च्या बेडरूम मध्ये तर मी कधीच फिरकले नाही. बाहेरच्या खोलीचे दार उघडे ठेवायचे. गॅलरीत उभे राहून बाहेर पाहिले की इथे कोणीही राहत नाही असे वाटायचे कारण की सर्वांची दारे बंद. रस्त्यावर कोणी दिसायचे नाही. सगळे रस्ते सुनसान. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे रहायला आलो होतो त्यामुळे कुठेही कसलीही रहदारी किंवा माणसे दिसत नव्हती. बरेच विद्यार्थी भारत दौऱ्यावर गेले होते आणि अमेरिकन्स त्यांच्या घरी गेले होते. हे सर्व मला साऊथ इंडियन मैत्रिणींनी सांगितले.






हळूहळू रूळत होते. माहिती करून घेत होते. एकदा शेजारणीचे दार उघडे होते म्हणून डोकावले तर तिची सामानाची बांधाबांध चालली होती. तिला म्हणाले की तुला काही मदत हवी असेल तर सांग पण तरीही तिने कोणत्याही प्रकारची मदत घेतली नाही. खाली राहणारी मैत्रिण तिच्या मुलाला घेऊन अधून मधून माझ्याकडे येत होती पण तिचीही जुजबी ओळख असल्याने जास्त बोलणे होत नव्हते. एके दिवशी आम्ही तिघी मिळून ग्रोसरीला गेलो तर मला खूप छान वाटले. आधार वाटला. २०६ मधल्या कुटुंबाची जाण्याची तयारी होत होती. त्यांना आम्ही जेवायला बोलावले. जाताना तिने मला काही काचेच्या बरण्या व प्लस्टीकचे डबे दिले.






२०६ अपार्टमेंटमध्ये आम्ही रहायला जाणार होतो. २०६ मध्ये जे भारतीय कुटुंब राहत होते त्यांना राहती जागा सोडून दुसऱ्या शहरात वास्तव्यासाठी जायला भाग पडले म्हणून आम्ही त्यांचे अर्धवट मोडलेला करारावर सह्या करून तिथे रहायला जाणार होतो. असे केल्याने त्यांचे बरेच पैसे वाचणार होते. अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी अपार्टमेंटच्या ऑफीसमध्ये जाऊन एका करारावर सही करावी लागते. हा करार जमिनीचा मालक व तुमच्यात होतो. काहीही कारणाने जर करार मोडला गेला तर उरलेल्या सर्व महिन्यांचे भाड्याचे पैसे भरावे लागतात. शिवाय डिपॉझिट रक्कमही परत मिळत नाही. हा करार वर्षाचा करावा लागतो.






२०६ मध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतला कारण की त्या जागेत जरूरीपुरते सर्व सामान होते. बेड, टेबल, टी पॉय, एक फिरती खुर्ची. अर्थात हे सामान त्या कुटुंबाचेही नव्हते. त्या जागेत आधी जे कोणी राहून गेले होते ते त्यांनी तसेच त्या जागेत सोडले होते. ही जागा विद्यापीठ, भाजीपाल्याचे दुकान, व धुण्याच्या दुकानापासून चालण्याच्या अंतरावर होती. विचार केला की आपल्याकडे व्हीसा एक वर्षाचाच आहे. वर्षानंतर इथे राहिलो तर दुसरी जागा बघू. पण आम्हाला वर्षाच्या आत दुसरीकडे पोस्ट डॉक मिळाली व आम्ही डेंटन सोडले. २०६ मध्ये राहणाऱ्या फॅमिलीला टाटा केले व आम्ही २०६ मध्ये आलो. हा वर्षाचा काळ खूप मजेत गेला. नंतर अजून २ कुटुंबे आली. आमच्या चार कुटुंबाचा छान ग्रुप झाला. अजूनही काही विद्यार्थी मित्र झाले. अमेरिकेत आल्या आल्या आम्ही पहिले ८ दिवस ऍलन मर्चंडच्या बंगल्याशेजारी जो बंगला होता तिथे राहिलो होतो. ते दिवस कसे गेले ते मी "अमेरिकेत पाऊल पडल्यावर" या लेखात लिहिले आहे. २०६ मध्ये राहत असताना वेळ कसा छान गेला आणि मित्रमंडळ कसे जमा झाले त्यांच्या आठवणी मी "डेंटनच्या आठवणी" यामध्ये लिहित आहे.

14 comments:

Nisha said...

chan lekh aahe !! :)

rohinivinayak said...

Thanks Nisha !! :)

अनघा said...

लग्न करून अमेरिकेतच जाऊन संसार थाटायची स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक मुलीने वाचावे हे !

rohinivinayak said...

अनघा, प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद! अमेरिकेत जो येतो त्याचे प्रत्येकाचे सुरवातीचे अनुभव थोड्याफार फरकाने असेच असतात. सर्वजण लिहितात आणि सांगतातच असे नाही. आणि सांगितले तरी असे अनुभव जाणून घेण्याची पण कोणाला उत्सुकता नसते. माझे सर्व अनुभव मी लिहिणार आहे. तू प्रतिसाद दिलास त्यामुळे उत्साह आला आहे. निशा व अनघा अनेक धन्यवाद.

Anonymous said...

Rohini Taai, majhya junya athvaani taazya jhaalya ha lekh vachun. Agdi asech vatayche maalahi ithe navin navin alyavar. Me tar lagna jhalyavar lagech ithe ale hote, ithech majha sausaar thatla...khup goshti miss karayche me. Maala faar savay nhavti aai kade kaam karaychi pan aaichya haathakhali thoda-faar shikle hote, ghar kamala baai hoti aai kade so te niyamitpane karaychi savay nhavti, baainey sutti takli ki me madat karayche pan te mahinyat na ekda. Lagna tharavtana matra maala ithlya paristithichi jaaniv karun dili hoti so me te sarva adhich sweekarle hote, savay karun ghyayla matra thoda vel lagla. Ata valun pahate tar asa vatta ki kharach aplyala swawalambi karto America (kivva Bharata baher konatahi desh...swatahacha kaam swataha karnyachi changli sway lavto, apan konavarahi avlavbun rahat nahi kuthlyahi kaama sathi..agdi sadhya sahavasa sathi suddha nahi. Ithe khup vayaskar maansahi saagla swatahcha swataha baghtat, te baghun vatta ki aplya deshaat itki tarun manasahi ka bara chotya-chotya kaama sathi avlambun astat? Anhi ayushaat kahi milavnya sathi kahi gamvaava lagtach na tar pardeshi tumhaala baryaach soyi miltat tashya kahi soyi (jya tumchya deshaat miltat) tya milat nahi. Jitkya tarun vaayat tumhi pardeshi jaata titkach adjust hona easy jaata. Majha vaay 23 hota me ithe ale tehvha anhi me khup patkan saagla aaplasa karun ghetla. Ek maitrin 32-33 chi astana ali hoti tila khup vel lagla, khara saangaycha tar ti ajunahi adjust karu shakat nahiye. Vaayani fakta evdhach indicate karaycha hota ki jitka jasta kaal tumhi tumchya deshaat ghalavla asto titka vel lagto savayi badlayla, navin savayi lagayla.

Tumche posts vachayla nehemich chaan vatata, asech lihit raha.:)

- Priti

Anonymous said...

rohini, chan lekh ekdam. Priti chhya athvani khup awadlya. me pan 22-23 vya varsheech ithe aale. kasa na saglyancha sagla same asta :-) ti padgaonkaranchi kavita nahi ka. tumcha amcha same asta .. tari hi vegla. Priti kuthe astes tu ameriket?
-Pallavi

rohinivinayak said...

priti n pallavi,, thanks for your comments !

priti,,, ho paradeshaat anubhav vegle yetatach,, shivay changlya savayee pan lagtat,,, shivay deshat suddha lagna jhalyavar vegla sansaar asla ki suddha vegle anubhav yetat aani jababdarine vagayla shikavtat.

rohinivinayak said...

deshaat rahun je students shikshanasathi hostel var rahatat te pan khup swavalambi astat.

Anonymous said...

Pallavi, me chicago la aste. :)Mala padgaonkaranchya kavita khup avadtat. Tu kuthey astes?

Rohini Tai, maala vatta ithlya gruhini kivva students bharatat rahanarya madhyam vargiya gruhini kivva students peksha jasta swavalambi astat.

Tadjodi donhi deshaat ahetach pan tya tadjodi kartana aplyaat kaay changle goon ghadun yetayt hey mahatvaacha. Jar ti tadjod swachatechi, shudh havechi, powercutschi, mahagaichi, gardichi , paanyachi, jaagechi, anhi mukhya mhanjey vicharanchi asel tar hya anubhavani eka mansacha tolerence level nakkich vadhto pan tyani tyacha kharya arthane kahich bhaala hot nahi.

- Priti

rohinivinayak said...

khare aahe priti ...priti tuza phone no. dilas tar phone var bolta yeil :)kinva email address,, pallavila mi pratyaxat pahili nahiye pan bolali aahe, photot pahile aahe, tase tuzyashi bolavese vatate aani pahavesehi vatate :)

Anonymous said...

Priti,me mn la ale ahe.baryach thikani firlo ahe. kharach anubhav vishva samruddha hoat ahe. kahi babtit li rigid opinions ata ekdam flexible jhali ahet. change is the only constant thing in our life asa watatay :-)rohini tu priti shi bolalis ki me tuzya kadun ticha no. ghein. tasa pahayla gela tar apan pen frnds hotoy tighi. fb ani phone nasate tar apan patra thru ch bolalo asato na ..
-Pallavi

rohinivinayak said...

agadi khare aahe ga pallavi ! :)

Manasi said...

खूप छान लिहिलं आहे! सुरुवातीला मलाही खूप वैताग यायचा अमेरिकेत. Electric शेगडीवर सगळा स्वयंपाक व्हायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे सुरुवातीला माझी प्रचंड चिडचिड व्हायची :( शिवाय भांडी घासण्याची सवय नव्हती आणि ती करावी लागली कारण डिश-वॉशर असूनही मला तो वापरता यायचा नाही!

rohinivinayak said...

Thanks Manasi !!