Wednesday, February 15, 2012

अनामिका (६)




एके दिवशी संजलीची मैत्रिण तिच्या घरी तिच्या मावसबहिणीच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला येते. तिची मावसबहीण काही दिवसांकरता संजलीच्या वाड्यात राहत असते. तिच्या कॉलेजवर तिची हॉस्टेलची सोय होते तोपर्यंत ती वाड्यात असते. त्या काळात ती संजलीची छान मैत्रिण बनते. संजलीला तिच्या कॉलेजमधल्या काही मैत्रिणी अजूनही तिच्या घरी येत असतात. त्यांच्या कॉलेजमधला एक ग्रुप असतो. काही ना काही निमित्ताने त्या एकमेकींना भेटत असतात. कधी सहलीसाठी तर कधी शॉपिंगसाठी तर कधी एखादा कार्यक्रम बघण्यासाठी. आत्ता सुद्धा सर्व जणी या लग्नाला जायचे का नाही हे ठरवत असतात.







मैत्रिणीची मावसबहीण मुंबईला राहत असते व लग्नही मुंबईतच असते. लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण असल्याने संजली व तिच्या मैत्रिणी या लग्नाला जायचे असे ठरवतात. सर्वजणी मिळून कधी जायचे, काय करायचे असे बेत आखत असतात. त्या एक मोठी कारच बुक करतात. लग्ननिमित्ताने त्या सर्वजणींची एक छोटी सहलच होणार असते. लग्न मुंबईत असल्याने शॉपिंग, बीचवर जाणे, थोडीफार मुंबई भटकणे असे सर्व काही करायचे अस्त त्या ठरवतात. मैत्रिणीची मावसबहीण खूप श्रीमंत असते. लग्नाकरता तिच्या वडिलांनी काही फ्लॅटस तात्पुरते वापरण्यासाठी घेतलेले असतात. तिच्या वडिलांचा बिझिनेस असल्याने त्यांच्या मित्रपरिवारातील काही जणांनी मुंबईत काही फ्लॅटस विकत घेतलेले असतात व ते परदेशात असल्याने फ्लॅटस लग्नकार्यानिमित्ताने म्हणून मित्रांना वापरायला देत असतात. त्यामुळेच तर लग्नात कितीही पाहुणे आले तरी त्यांच्या राहण्याची सोय होणार असते.








लग्नासाठी म्हणून सर्व मैत्रिणी कारने निघतात. मधेवाटेत थोडे थांबून फोटोज काढणे, खाणे पिणे असे करत करत त्या सर्वजणी लग्नघरी येऊन पोहोचतात. त्यांचे तिथे खूपच आदरातिथ्य होते. त्यांना राहण्याकरता म्हणून जे फ्लॅटस दिलेले असतात ते पाहून तर त्या सर्वजणी खुश होतात. लग्नघरातून रात्रीचे जेवण उरकून जवळच असलेल्या जागेत की जिथे त्यांची राहण्याची सोय केलेली असते तिथे या सर्व मैत्रिणी येतात आणि आपापल्या बॅगा उघडून ड्रेस बदलतात व त्यांची गप्पा टप्पांना सुरवात होते. किती मस्त वाटतय ना इथे आल्यावर, उद्या काय करायचे, परवा केळवण आणि लगेच दुसऱ्या दिवशी तर लग्न, त्यादिवशी तर आपल्याला बाहेर पडता येणार नाही, हे आणि ते अशा गप्पांमध्ये रात्रीचे १२ वाजून कधी जातात हे त्यांना कळतही नाही. चला गं झोपा आता. उद्या लवकरच बाहेर पडू म्हणजे मॉल बीच असे काही ना काही असे सर्व बघता येईल. पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न कसे काय साजरे करतात याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. त्यांची मैत्रिण प्रिया व तिच्या मावसबहिणीच्या लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण यामुळेच तर हा योग आलेला असतो. त्यामुळे सर्वजणी खूपच आनंदात असतात.










उद्याचा दिवस संजलीच्या आयुष्यामध्ये लिहिलेला एक छान दिवस असेल आणि या दिवसामुळे मागच्या सर्व घडामोडींचा उलगडा होणारा ठरेल याची थोडीसुद्धा तिला कल्पना नसते. कशी असणार? आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे हे कोणाला माहीत असते का? सकाळी लवकर उठून न्याहरी करून सर्वजणी एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये येतात. त्या सर्वजणींना किती खरेदी करू नि किती नाही असे झालेले असते. साड्या, पंजाबी ड्रेसेस, काही आकर्षक वस्तू असे सर्व काही बघण्यात त्यांचा छान वेळ जातो. एका दुकानात तर साड्यांची आणि पंजाबी ड्रेस मटेरिअल्सची इतकी काही व्हरायटी असते की तिथे सर्वजणींची खरेदी सुरू होते. संजली म्हणते मी या सर्व पिशव्या घेऊन जाते व कारमध्ये ठेवते व थोड्यावेळाने येते तोवर तुम्ही बाकीची ठिकाणे बघा. कारमध्ये बसून मी जरा घरी फोन करून घरची खुशाली विचारते. शिवाय खरेदीच्या इतक्या पिशव्या झाल्या आहेत त्यातल्या काही पिशव्या तरी मी घेऊन जाते व कारमध्ये ठेवत असे म्हणून दोन हातात पिशव्या घेऊन, एका खांद्यावर तिची पर्स, हातात कारच्या किल्या व मोबाईल असे सर्व ओझे उचलून ती भराभरा शॉपिंग मॉलमधून बाहेर येत असते. तिने लिंबू रंगाची साडी तसाच मॅचिंग ब्लाऊज घातलेला असते, डोक्यावर गॉगल अडकवलेला असतो. छोटे कुंकू, शँपू केल्याने तिचे केसही थोडे भुरभुरे झालेले असतात.









चालत असतानाच तिला मागून एका पुरुषाचा आवाज येतो. "हॅलो, हॅलो, एक मिनिट, तुमची पिशवी" "कोण आहे? " अशा प्रश्नार्थक नजरेने ती मागे बघते आणि बघतच राहते. एकदम भांबावते. " अरे तू?? तू इथे कसा काय? " जवळ जवळ ती ओरडतेच. आणि तोही तिच्या हातातून पडलेली पिशवी तिला देत तिच्याकडे बघतच राहतो. अगं तुझ्या हातातून ही पिशवी पडली म्हणून देण्याकरता तुला हॅलो हॅलो म्हणून किती हाका मारल्या! आणि एकदम तूच अशी समोर येशील हे म्हणजे मी स्वप्न तर बघत नाही ना! असेच वाटत आहे मला. "होना! एक मिनिट. थोड्या पिशव्या घेना! आपण या कारमध्ये ठेवू व मग बोलू. संजली कारचे दार उघडून मागच्या सीटांवर सर्व पिशव्या ठेवते. "एक काम कर. तू कारमध्येच बस, मीही बसते. इथे इतकी गर्दी आहे ना! "









अमित व संजली दोघेही कारमध्ये बसतात. मोबाईल पर्समध्ये ठेवता ठेवता संजली अमितला विचारते " अरे कित्ती वर्षांनी भेटलास? कसा आहेस? कुठे असतोस? मला तुला बघून खूपच आनंद होत आहे." अमितही तिला म्हणतो "मलाही खूप आनंद होत आहे तुला बघून. कशी आहेस? तुझ्यात खूप फरक पडला आहे. एकदम मॉड बनली आहेस. " "तू मात्र अगदी पूर्वीसारखाच आहेस की रे! आणि आमच्या लग्नाला का नाही आलास? मी विचारले पण मला कोणी काही सांगितले नाही. आता तू पुण्याला ये आमच्या घरी. अमित तिला म्हणतो "अगं संजली ऐकून तर घे माझे. मी युएस मध्ये असतो. मी सध्या भारतभेटीमध्ये आलोय. आणि दोन दिवसांनी माझी फ्लाईट आहे. मी इथे काही खरेदी करण्यासाठी आलो होतो. तुझे लग्न झाले हे मला माहीत आहे, पण मी लग्नाला का आलो नाही हे नंतर मी सांगेन तुला कधीतरी" " अरे माझे लग्न तर इतके घाईत ठरले ना, मला खरे ते लग्न करायचेच नव्हते, मला खूप शिकायचे होते, प्रोफेसर व्हायचे होते. आईबाबांना मला कधीच सोडायचे नव्हते. पण ही आत्या, हिला खूप बरे नव्हते, हॉस्पिटलमध्ये होती, खूप सिरिअस होती. तिने हेकाच धरला की तूच माझी सून व्हावीस अशी माझी इच्छा आहे.








हंऽऽऽऽऽ त्या असे म्हणणारच. बरं मला एक सांग तू किती दिवस आहेस मुंबईत? " मी अजून दोन-तीन दिवस आहे. अरे मी इथे एका लग्नाला आली आहे मैत्रिणींबरोबर. माझ्या एका मैत्रिणीच्या मावसबहिणीचे लग्न आहे. ते परवा झाले की नंतर एक दोन दिवसत आम्ही निघू पुण्याला" अमित तिला विचारतो. मग उद्या भेटायचे का आपण? इतक्या वर्षांनी भेटली आहेस तर थोड्या गप्पा मारू. मी तुझ्या लग्नाला का आलो नाही ते मी तुला सविस्तर सांगेन. उद्या अगदी सकाळी नाही तरी दुपारपरंत भेटशील का? अंजली म्हणते, हो हो नक्की रे. मलाही छान वाटेल. पण उद्या भेटायचे म्हणजे जरा तारेवरची कसरतच आहे, पण बघते मी कसे काय जमते ते. मी तुला तसा फोन करेन. दोघेही एकमेकांचे फोन घेतात. आत्ता सुद्धा मला थोडा वेळ आहे मला. माझी थोडीफार खरेदी झाली आहे. बराच वेळ फिरतोय आम्ही. माझ्या मैत्रिणींना अजूनही काय काय बघायचे आहे.









आपण इथे कारमध्येच थोडावेळ बसू मग मी जाते. संजली एका मैत्रिणीला फोन लावते व विचारते तुम्ही कुठे फिरताय, किती वेळ लागेल... मी थोडावेळाने येते.... होहो.... " फोनवर बोलताना अमित संजलीकडे बघत असतो. मनात म्हणतो संजली मॉड वेषातही तितकीच सुंदर दिसत आहे. चेहऱ्यामध्ये तर काहीही फरक पडलेला नाही हिच्या. अगदी तसाच पूर्वीसारखा सुंदर. उद्या भेटलो की काय ते सर्व बोलू मनातले. नंतर परत भेट होईल का नाही ते सांगता येणार नाही. मी भेटल्यावर तिला किती आनंद झाला आहे हे तिच्या चेहऱ्यावरूनच कळते आहे. संजली पण फोनवरून बोलता बोलता अमितकडे बघत असते. मनात तिचेही विचारचक्र चालूच असते. अमित पूर्वीइतकाच स्मार्ट दिसत आहे. पण दोन दिवसात का जाणार हा युएसला? अनिलला भेटायला का नाही येणार हा? मुंबई पुणे जास्त अंतर कुठे आहे? मैत्रिणीशी फोनवर बोलून झाल्यावर ती मोबाईल पर्समध्ये ठेवून अमितकडे बघत तर अमित तिच्याकडेच बघत असतो "छान दिसत आहेस" असे तिला म्हण्तो. संजली गालातल्या गालात हसते आणि म्हणते कुठे भेटायचे आपण उद्या?




क्रमश:

5 comments:

Anonymous said...

Wah! Rohini Taai, As usual khupach chaan lihilay ha bhaag! Maitrinin barobar chi majja tumhi agdi perfectly describe keli ahe..maala majhech purviche divas athavle. :)
Majhya bahinichya lagnala tichya maitrin barobar me ashich khup majja keli hoti - lagnachi kharedi, mehendi, bangdya bharne, ratri ushira paryanta gappa marne [gharatlya mothyan peiki konhitari raagavlyavarach ;)] va lagnachya divashi tar karavli mhanun veglich majja! Maala vatta me majhya lagna pekshahi majhya bahinicha lagna jasta enjoy kela hota. :) :)

Sanjali- Amit chi pudhchi bhet vachaychi khup utsukta ahe...ata pudhchya bhaagachi vaat pahate. :)

- Priti

rohinivinayak said...

Thanks priti,, mala vatlech hote tu lagech abhipray deshil mhanun,,, mala tula baghaychi khup utsukata aahe...kenvha aapli bhet hoil kaay mahit :)

sanjali amit chi bhet aani tya nantarchi katha ajun aavdel tula :)

Anonymous said...

hey not done yaar .. kiti utsukata tanashil. ata ek tar tu next bhagat complete katha lihi nahitar fatafat pudhche bhag taak.. asa kela nahis tar me tula chakk ph karun pudhe kai zala te vicharen naitar :D

rohinivinayak said...

chalel mag phone kar mala tu!! mi vaat pahin :) khare tar kon konachi utsukat tanat aahe?? anonymous comment deoon ?? :( pudhche sarv bhag lihayla aata khup ushir karnar nahi... pan sandarbh neet lagle pahije na kathet,, tyamule vel lagto,, ekada ka patapat vahit utarvun kadhle ki mag type karun blog var lihine patkan hote,,, thanks!!

Anonymous said...

hey aga pahilyanda comment keli naa me blog var haha nemki anonymous zali hoi barrr ani sorry missed ur call canda madhe call chalu hota maza . pudhil bhag tak lavkar lavkar baba :)

- naam to malum hi hoga :D