Saturday, August 15, 2026

15 August 2016

 

विनुच्या ऑफीस मधला मित्र व आम्ही दोघे आज एका भारतीय उपाहारगृहात जेवायला गेलो. हे दोघे बऱ्याच गप्पा मारतात. जगभरात काय काय चालू आहे. भारत-अमेरिकेचे राजकारण, केमिस्ट्री, ऑफीस मधल्या गप्पाटप्पा आणि इतर. विनूला कळाले की त्याचा वाढदिवस ऑगस्ट मधलाच आहे म्हणून त्याला आज आमच्याबरोबर जेवायला नेले. मुख्य म्हणजे त्याला इंडियन फूड खूप आवडते. करी आणि चिकन तर बऱ्याच अमेरिकन लोकांना आवडते पण ह्या मित्राला रगडा पॅटीस व पाणी पुरी पण माहिती आहे. तर मी त्याला पाणी-पुरी कशी खायची ते दाखवले. तशी त्याने एक खाल्ली. नंतर त्याने एका पुरीत लोणचे व भाजी घातली व खाल्ली. 🙂 तो म्हणाला की अजून एक पदार्थ खाल्ला होता तो दुधापासून बनवला जातो आणि अंड्याच्या आकाराचा असतो तेव्हा गुगल मधून शोधून मी त्याला हाच का तो पदार्थ म्हणून दाखवला तर तो होता गुलाबजाम ! मित्राने buffet जेवणाला व्यवस्थित दाद दिली. आम्ही दोघे आता ते खाण्याच्या लायकीचे उरलो नाही. ठराविक आहार झाला आहे दोघांचा. मी तर भाजी सांबार कडे न बघता ठराविक पदार्थ घेते की जे घरी बनत नाहीत ते म्हणजे पाणीपुरी, नूडल्स,भजी, एखादा वडा आणि सांबार, एखादाच नान व भाजी आणि गोड पदार्थ. विनू भात, भाज्या आणि सूप घेतो. अश्या रितीने आजच्या भारताच्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने दोघांचे वाढदिवस साजरे झाले. मित्राचा ऑगस्ट च्या सुरवातीच्या आठवड्यात तर विनुचा शेवटच्या आठवड्यात असतो. दोघे एकाच वयाचे आहेत. काहीतरी वेगळे घडले तर मी ते रोजनिशीमध्ये लिहिते एक कायमची आठवण म्हणून.
15 August, 2026 
 


 

No comments: