मी, विकी आणि कार्मेन (spanish) आम्ही तिघी उत्पादन विभागात आहोत. मला कार्मेन ने काम शिकविले. विकी आणि कार्मेन दोघीही एकमेकींच्या नावाने खडे फोडत असतात. उत्पादन विभागात खूप काम असते. आमच्या मदतीला सुशीवाल्या बायका त्यांच्या मनात असेल तर त्यांचे काम संपवून आम्हाला मदत करतात. त्यात एक लुलू
नावाची बाई आहे. हे नामकरण विकिनेच केले आहे. ही लुलू नावाची बाई मुळची फिलीपाईन्स देशातली. ही ६३ वर्षाची आहे.
आम्हाला हॉट बारला मदत करावी लागते. कारण की कस्टमर्सना पहिले प्राध्यान्य दिले जाते. एकदा एक बाई आली आणि मी तिथे होते. तर मला म्हणाली दोन ड्र्मस्टीक. मी गोंधळले. विचारले शेजारच्या टबाटाला. ति म्हणाली she wants fried legs Rohini
, oh ! (me)
ऑर्डर देणाऱ्या बाईने पण ड्रमस्टीक वाजवण्याची ऍक्शन करून दाखवली आणि म्हणाली, it looks like drumsticks ! oh, got it ! (me)
एका तंगडीची किंमत किती हे यादीत पाहिले आणि त्याप्रमाणे गुणिले २ करून लेबल प्रिंट केले आणि तिला २ तंगड्या दिल्या. इथे ऑर्डर देताना काही जण जेवणाची ऑर्डर देत नाहीत. तर काहीवेळा ८ किंवा १६ पिसेस ऑफ चिकन मागतात. त्यात 8 pieces means 2 breast, 2 thigs, 2 legs and 2 wings. त्याचे मी मनातल्या मनात मराठीकरण केले आणि मनातल्या मनात खूप हासले.
नंतर एके दिवशी एकदा एक माणूस आला आणि मला म्हणाला I want dark meat, मी परत गोंधळले आणि विचारले तर टबाटा म्हणाली he wants legs and wings rohini
गोंधळण्याचे कारण की जन्मात कधी मांस आणि चिकन पाहिलेही नाही आणि खाल्लेही नाही. मी मांस त्याच्या रंगावरून ओळखायला लागली आहे. हॅम म्हणजे गुलाबी , रोस्ट बीफ म्हणजे लाल त्याच्या कडा काळपट. बीचवुड हॅम म्हणजे गुलाबी आणि कडा विटकरी आणि फुलासारख्या गोलगोल. मांसाचे बरेच प्रकार आहेत. हॅमच्या पातळ चकत्या म्हणजे आपल्या तांदुळाच्या ओल्या पापड्या रंग वेगळा
हॅल सलाड म्हणजे दिसायला गाजरहलव्यासारखे रंग वेगळा.
सगळ्यांना माहीती झाले आहे की मी पक्की शाकाहारी आहे ते. शिवाय मी दारूही पीत नाही आणि सिगरेटही ओढत नाही ते.
मला एकदा एकीने विचारले की इंडियातले सर्व लोकं असेच आहेत का? तर मी म्हणाले नाही गं ! आमच्यासारखी मोजकीच लोकं अशी आहेत. बाकी सर्वजण मांसाहार करतात, दारू पितात आणि आणि सिगरेटीही फुंकतात. ती हासली
आणि ओके म्हणाली.
लुलूच्या मजा नंतर सांगीन.
No comments:
Post a Comment