पाऊस,,, आठवतोय मला,,, पावसाचे पाणी अंगणात साठायचे आणि मग आम्ही दोघी
बहिणी कागदाच्या छोट्या मोठ्या होड्या करून पाण्यात सोडायचो,,, आठवतोय ,,,
दुपारी वामकुक्षी घेत असताना जाग आल्यावर पूर्णपणे अंधारलेले असायचे,,
कडकडाट चालू असायचा ढगांचा ,,, लख्खन वीज चमकायची आणि याची कोसळायला
सुरवात,,, आठवतोय मला अमेरिकेत लांबलचक पत्र लिहिताना,, दार उघडे ठेवलेले
असायचे,, पावसाळी वातावरण,, धोधो पाऊस,, अर्धवट लिहिलेलं पत्र सोडून गॅलरीत
उभी राहिलेली मी आणि मन निघून गेलेलं भारतात,, आठवतोय मला पाऊस ,
,,
दिवसभर झिमझिमणारा आणि संध्याकाळी गारवा आल्यावर लगेच भजी करण्याची
सुरसुरी,, आठवतोय पाऊस,,, जेव्हा जमीनीवर पडायला सुरवात व्हायची तेव्हा
इच्छा व्हायची छत्री घेऊन चालायची,,, आठवतोय पाऊस,,,उन्हाच्या तलखीमुळे
पहिल्या पावसाच्या सरी अंगावर घेतल्यावर सुखाची होणारी बरसात,, आठवत आहेत
मला असे बरेच पावसाळे !! ये रे ये रे पावसा,,, तू येत रहा, तुझ्या येण्याची
मी नेहमीच आतूरतेने वाट पाहत होते,,, पाहत आहे,,, पाहत राहीन.
:)
Rohini Gore
No comments:
Post a Comment