Monday, August 08, 2011

मनात भरून राहिलेले! .... (1)

काही काही गोष्टी आपल्या मनात खूप भरून राहिलेल्या असतात आणि नंतर केव्हातरी अचानक त्या गोष्टी आपल्याला आठवतात. गोष्टी आठवल्या की आपले मन त्यामध्ये रममाण होऊन जाते.






एखादे कानातले, गळ्यातले, ड्रेस किंवा एखादा रस्ता, एखादा खाण्याचा प्रसंग, छान पुस्तक, किंवा एखादी आठवण असे सर्व काही. या अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खूप आवडलेल्या असतात, मनात भरलेल्या असतात त्याहूनही अधिक त्या आपल्याला कालांतराने अशाच पटकन काही ध्यानीमनी नसताना आठवतात तेव्हा जो आनंद होतो तो शब्दात वर्णन करता येत नाही.







गेले दोन चार दिवस मला माझे पूर्वीचे कानातले झुमके आठवत आहेत. कॉलेजमध्ये असताना मला माझे कानातले पांढर झुमके आठवत आहेत. या आठवण्यावरूनच मला हे मनात भरून राहिलेले आठवून लिहावेसे वाटले. कुंकवामध्ये मला टिकली अजिबात आवड नाही. मला कुंकू म्हणजे ओले कुंकू लावायला आवडते आणि ते सुद्धा मरून रंगाचे. मरून रंगाच्या खाली एक अगदी छोटे काळे कुंकू लावायला आवडते. भारतातल्या ट्रीपमध्ये मी ही दोन्ही कुंकू गेल्यावर्षी आणली होती पण अगदी मोजून दोन वेळाच लावली. ती आता वाळूनही गेली असतील. टिकल्या लावल्या पण त्यातही मला जांभळ्या रंगाची टिकली मनात भरून राहिली होती. स्वेटर्समध्ये माझा एक लव्हेंडर रंगाचा व माझ्या बहिणीचा शाई रंगाचा स्वेटरही असाच मनात भरून राहिला आहे.







बांगड्यांमध्ये मला काचेच्या बांगड्या मनापासून आवडतात त्यातही वर्ख लावलेल्याच आवडतात. लग्नानंतर सोन्याच्या बांगड्यांमध्ये या वर्ख लावलेल्या काचेच्या बांगड्या खूप उठून दिसायच्या. श्रावणात आईकडे गेले की ती नेहमी आम्हा दोघी बहिणींना बांगड्या भरत असे. त्यात मला गुलाबी रंगाच्या वर्ख लावलेल्या बांगड्या खूपच आवडून गेल्या होत्या. त्या मी बरेच दिवस जपूनही ठेवल्या होत्या.








लहानपणी आपण बरेच फ्रॉक घालतो, स्कर्ट घालतो, शर्ट पॅंट, पंजाबी ड्रेस घालतो व साड्याही नेसतो. या सर्वांमध्ये एक फ्रॉक माझ्या मनात भरून राहिलेला आहे. मोरपंखी आणि एक हिरव्या रंगाची वेगळीच शेड होती. असे दोनी रंग त्यामध्ये होते. त्यावरचे डिझाईन असे काही होते की अगदी निरखून बघितल्यावर इंग्रजी दुसऱ्या लिपीतले टी अक्षर त्या डिझाईनमध्ये सर्वत्र पसरलेले आहे असे दिसायचे. साड्यांमध्ये मोजक्या साड्या खूपच भरून राहिलेल्या आहेत. या सर्व साड्या आईच्याच आहेत. त्यात एक मरून रंगाची अमेरिकन जॉर्जेट होती, खूप पारदर्शक साडी, त्यावर असेच मोठे डिझाईन ते त्या साडीवर कोरल्यासारखे वाटायचे. विमलची गुलाबी रंगाची, बांधणीची लाल रंगाला हिरवे काठ असलेली साडी, शिवाय चाकलेटी रंगाची त्यावर मोठाली पिवळ्या रंगाची फुले असलेली साडी खूप भरून राहिल्या आहेत मनामध्ये. आईची एक प्युअरसिल्कची साडी मद्रासी रंगाची त्याचा तो मुलायम स्पर्श अजूनही आठवत आहे.







पंजाबी ड्रेसमध्ये एक ड्रेस होता त्याचा रंग म्हणजे चाकलेटी, मोतीया व राखाडी रंग यांचे मिश्रण. हा ड्रेस तर इतका काही मनात भरला होता आणि खूप वापरला गेला. नुसता मी एकटीने वापरला नाही तर माझ्या बहिणीने व मामेबहिणीच्या मुलीनेही तो खूप वापरला. असाच अजून एक पॉलिएस्टरचा काळा पंजाबी ड्रेस ज्यावर डिझाईन म्हणजे पांढरे चौकोन, धुतला वाळत आणि वाळत घातला की १० मिनिटात वाळायचा. माझी आई खूप वेगवेगळ्या फॅशनचे ड्रेस घरीच शिवायची त्यात मॅक्सी नावाचा प्रकार होता. हा ड्रेसचा प्रकार असाच खूप मनात भरलेला. लांब केस असल्याने आई आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालायची, त्यात चार वेण्या हा प्रकार खूप मनात भरलेला आहे. जेव्हा आई आम्हां दोघी बहिणींच्या चार वेण्या घालायची तेव्हा आम्ही दोघी जाम खुशीत असायचो!






या अशा आठवणी आठवण्यापेक्षा ध्यानीमनी नसताना जेव्हा आठवतात की ज्या मनात खूप भरून राहिलेल्या आहेत त्या आपोआप वर येतात, त्यांना मुदाम आठवण्याची गरजच भासत नाही आणि जेव्हा त्या आठवतात त्याची मजा काही औरच! नाही का?





आणि ज्या काही मोजक्याच मनात काठोकाठ भरलेल्या आठवणी..... ज्या आठवल्या की ... ‍ज्याचे वर्णन म्हणजे अंगावरून हळूवार फिरवलेले मोराचे पीस... मनात उडालेले सुखाचे कारंजे, केवळ अवर्णनीय!



मनात भरून राहिलेले घेऊन येईन पुन्हा कधीतरी!

9 comments:

mau said...

khup sundar aathavani...maajhyaahi manaat ashaa baryaach goshti aahet..aaj nakalat punhaa aathwalyaa..:)

rohinivinayak said...

Thanks Uma, kiti chhan vatate na ase kahi aathvlyavar. :)

Nisha said...

Mast mast :)

rohinivinayak said...

Nisha, Thank you!

Nisha said...

Rohini tai ya lekhacha pudhacha bhag liha na please - tumhi lihilay ki aankhi aathwani gheun yein ....

Nisha said...

Rohini tai - ekandarch tumchya aayushyavar tumhi plz liha na - mahanje lahanpapasun survat karun aattaparyant kasa kay ghadala te - school - college - marriage - US trip asa sagala pravas kasa kay zala - aalele bare vait anubhav he sagala vachayla khup aawdel .... aarthat hi fakt request aahe -Note sure if you would be interested in writing abt urself pan tumcha lekha khup aawadtat mala - ekdum jasa aahe tasach lihita tumhi - It appear to be very real :)
Regards
Nisha

rohinivinayak said...

Nisha, ho parat asech aathvle ki lihin sarv manat bharun rahilele kinva laxat rahilele :) nisha, tu agadi manapasun sarv vachat aahes agadi! chhan vatle. aayushyavar tase mi veg veglya bhagamadhe mhanjech aathvani kinva ameriketil maze anubhav ya label khali lihile aahe. :)Thanks a lottt.... Nisha :) :)

वेब दुनिया said...

Rohini mam tumcha lekh khrch khoop Chan aahe mla aawdla...,tumhi tumchya U.S trip bddl pn aawrjun lihaa mi waat pahtoy
,Thank. You Rohini mam!

rohinivinayak said...

Thanks you so much for your comment !! tumhala lekh aavadla he vachun khup chhan vatle,, ho mi US baddal pan barech lihile aahe "maze ameriketil anubhav" yamadhe aani shivay barech kahi lihile ahe aani lihinar aahe,, keep reading, ! thanks so much once again !