Tuesday, July 26, 2011

२६ जुलै २०११

आजचा दिवस वेगळाच होता. २-३ दिवस झाले बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. सकाळी उठल्यावर पावसाळी हवा असते. आज पाऊस होता. दिवसभरात थोडा थोडा करत बराच पाऊस झाला त्यामुळे मस्तच वाटले. मला पावसाळी वातावरण आणि पाऊस खूपच आवडतो.






सकाळी तळ्यावर गेले तर बदकपिल्लांचे फोटो घेतले. गवतावर छान फुले उमलली होती. त्यात एक लव्हेंडर रंगांची तर छानच दिसत होती. पिवळी व लव्हेंडर रंगाची बरीच फुले होती. हिरवेगार गवतही छान दिसत होते. तळे ओसंडून वाहत होते. आज फेसबुकवर फोटो पाहताना एक आगगाडीचा फोटो पाहिला. फलाटाला लागून आगगाडी उभी होती असा फोटो होता. तो पाहिल्यावर पूर्वीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. पावसावर आणि आगगाडीवर लिहायचे आहे. लिहायचे म्हणजे आठवणी. पावसाच्या काही लिहिल्या आहेत त्यात अजून थोडी भर घालायची आहे. आज सकाळीच पावसाळी हवा दिसल्यावर लगेच थोडे लिहावेसे वाटत होते.






आज दिप्तीने एका पदार्थाची रेसिपी सांगितली. लवकरच करून पाहणार आहे. आज लायब्ररीत गेले. सगळीकडे हिरवेगार झाले होते. बसस्टॉप वरच्या गवतात छोटी फुले मस्त दिसत होती. आज सबंध दिवस कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन... हे गाणे मनात रेंगाळत राहिले.






बसमधून जाताना पाऊस अधुनमधून पडत होता. छत्री होतीच पण ठरवले की छत्री उघडायची नाही पाऊस आला तरी, भिजायचे ठरवले होते, पण माझा स्टॉप आला आणि पाऊस थांबला. मी अमेरिकेत कधीही पावसात भिजलेली नाही. भारतात जून मधल्या पहिल्या पावसाची सर अंगावर घेतल्याशिवाय राहिले नाही. आज आईशी बोलताना तिचे वेगळे रुटीन ऐकून खूप छान वाटले. थोडे रूटीन बदलले आहे. आज फोटोग्राफी छान झाली, मनासारखा पाऊसही झाला तरीही आज खूप आनंद झाला नाही. नाहीतर काही वेळा खूप आनंदाच्या उकळ्या फुटतात.






तशा आनंदाच्या उकळ्या परवा खूपच फूटत होत्या. विद्यापिठात फुले पाहिल्यावर खूप आनंद झाला होता. त्या आनंदाच्या मूडमध्ये मी एक खूप छान कल्पनाचित्रही मनात रंगवले होते.

2 comments:

urmila said...

kiti sundar phul aahet g. khoop fresh vatal photo pahun. selection pan faar chhan aahe tuz.
uwadwekar@yahoo.com

rohinivinayak said...

Thanks a lot urmila!