
रात्रीचा मेनु.
आजचा दिवस वेगळाच होता. एफबीच्या छंद समूहात गाणे गायची थीम होती. तिथे वेगवेगळ्या वयानुसार गट केले होते. त्यात मी दोन गाणी
आधीच रेकॉर्ड केलेली दिली. एक होते धुंदी कळ्यांना आणि दुसरे ओ सजना बरखा बहार आई. ओ सजना हे गाणे
२०१९ सालच्या भारत ट्रीप मधले होते. आज खूप टाईम पास केला. सेल्फी काढत बसले त्यात फोटोत बरेच इफेक्टस दिले. कृष्ण धवल असे काही काही. आज ग्रोसरी केली नाही, ती आता उद्या करू. आज खूप थंडी होती. अजूनही अमेरिकेतली थंडी पूर्णपणे गेलेली नाही.
त्यात हा कोरोना आला. कालच आजचा सकाळचाही स्वयंपाक करून ठेवला होता त्यामुळे आजचा दिवस रिलॅक्स गेला.