खरेच असे काहीतरी वेगळे केले की जामच उत्साह येतो. मिनरल्स संग्रहालयात एक
बाई कानातले बनवत होती. मला लगेचच कानातले खरेदी करण्याचा मोह झाला.
तिने काही कानातले बनवलेही होते.ती म्हणाली की तुला पाहिजे ते रंग तू निवड
मी तुला तुझ्यासमोर तुझ्यासाठी कानातले बनवून देते. मी माझा आवडता जांभळा
आणि केशरी रंग निवडला. खूप वेगळ्या आकाराचे कानातले बनवून घेतले. मला तर
खूपच आवडून गेले आहेत. डाऊनटाऊनला फूटपाथवरून फिरताना खूप छान वाटते.
जेव्हा आम्ही हँडरसन मध्ये नव्याने रहायला आलो तेव्हा सुरवातीला इथल्या
फूटपाथवर चालायचो. आज जवळजवळ अडीच वर्षानंतर डाऊनटाउनला फिरायला गेलो. मला
नोकरी लागल्यापासून शनिवार रविवार मी कामावर आणि विनायक घरी असेच चित्र
असते. सध्या मला शनिवार ऑफ मिळायला लागला आहे. तसे काही वेळेला पूर्वी पण
मिळाला आहे पण आता ठरवले आहे की शनिवार ऑफ मिळाला की काहीतरी वेगळे करायचे
म्हणजे उत्साह येतो. आत्ता रात्री उसळ केली आणि डबा भरला. उद्या कामावर
जाण्यासाठी उत्साह आलेला आहे. आणि नवीन कानातले पण घालून जाणार आहे. फोटो
इथे अपलोड करत आहे.
:) Rohini Gore
