Friday, November 04, 2011

मी अनुभवलेली अमेरिका (5)

आम्ही जेव्हा भारतात भारतभेटीसाठी जातो तेव्हा आमच्या मित्रमंडळांपैकी काहीजण आवर्जून आम्हाला भेटायला येतात. मनमोकळेपणाने गप्पा मारतात. काही आम्हाला भारतातून इथे फोनही करतात तेव्हा खूप छान वाटते. काही जणांना काही कारणानिमित्त भेटणे झाले नाही तरीही राग धरून बसत नाहीत किंवा फोनवर सविस्तरपणे बोलतात.







आम्ही एका मित्राकडे असेच गप्पा मारत बसलो होतो तर तिथे एकजण आले आणि आम्हाला विचारले की तुम्ही कुठे असता अमेरिकेत? तर आम्ही त्यांना सांगितले की आम्ही नॉर्थ कॅरोलायना राज्यात राहतो. त्यांचा चेहरा निर्विकार,, म्हणाले आमचा मुलगा न्युयॉर्कला राहतो. बऱ्याच जणांना अमेरिका म्हणजे ठराविक राज्य किंवा शहरे म्हणजेच अमेरिका असे वाटत असावे. उदा. न्युयॉर्क, न्युजर्सी, कॅलिफोर्निया कारण की बरेच भारतीय हे या अशा मोठ्या शहरांमध्येच येतात. अमेरिका देश किती मोठा आहे, त्यात राज्ये किती व त्यात शहरे किती याची माहिती करून घेण्यात स्वारस्य नसते जसे की भारतातही पुणे मुंबई ही शहरे सोडल्यास अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहर हे पण माहीत नसते किंवा स्वारस्य नसते.







भारतातील काही जण मात्र आवर्जून आपुलकीने विचारतात तुम्ही वेळ कसा घालवता, भाज्या, फळे, बाजारहाट कसा करता, हवामान वगैरे कसे आहे. हवामानाच्या बाबतीतही बोलायचे झाले तर अमेरिकेत बर्फ पडतो हेच लोकांना माहिती पण इथेही रणरणते उन असते हे माहिती नसते. जसे की टेक्साज राज्यात उन्हाळा खूपच कडक असतो इतका की रात्री फिरायला बाहेर पडावे तरी उष्ण झळा लागतात.






गुळगुळीत रस्ते, कार्स, मोठमोठाली घरे, मोठमोठाले मॉल्स, एक डॉलर गुणिले ५० रुपये, म्हणजेच फक्त अमेरिका आहे असे नाही. अपार्टमेंटसची भाडी, टॅक्सेस, इन्शुरन्स, इथला डॉक्टर, इथे मोलकरीण नसल्याने करावी लागणारी सर्व प्रकारची कामे, काही शहरात भारतीय खूपच कमी, भारतीय उपहारगृह किंवा किराणामालाची दुकाने नाहीत, किंवा खूपच भारतीय आहेत, आणि फक्त होणारे पॉटलक किंवा गरजेनुसार भेटीगाठी अशा प्रकाराने ज्याला खरच अमेरिका जाणून घ्यायची इच्छा आहे त्याला बरेच काही सांगण्यासारखे आहे. भारतातून अनेक प्रकाराने भारतीय इथे येत असतात, त्यामध्ये अगदी सुरवातीला मी लिहिलेले आहे की आम्ही इथे पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी आलो. एकूण इथल्या भारतीय लोकसंख्येत विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप आहे.







एम. एस. करणारे, पीएचडी करणारे, त्यातही वर्गवारी आहे की जे इंजिनिअर होऊन लगेच इथे येतात, काही जण नोकरी करून मग ती सोडून इथे शिक्षणासाठी येतात, तर बरेच बडे बाप के बडे बेटे, किंवा अगदीच श्रीमंतच असे नाही तर इथला सर्व शिक्षणाचा, राहण्याचा खाण्यापिण्याचा सर्व खर्च चलनी रुपयांचे डॉलर्स मध्ये रुपांतर करून आईवडील भरतात. इतकेच नाही तर कोणत्याही प्रकारची इथे आबाळ होऊ न देणे, सर्व सणांचे पॅकेटस घरपोच कुरीअर तर्फे पाठवणे असेही आहेत. काही जण एम. एस करून नंतर पिएचडी करणारे व ती संपल्यानंतर पोस्ट डॉक्टरेट करणारेही आहेत. या सर्वात यांचा कालावधी १०-१२ वर्षे जातो.








डॉक्टर्स, मोटेल्सवाले, भारतीय कंपनीतून बी १ व्हीसावर इथे कामानिमित्ताने येणारे किंवा एच १ व्हिसावर थेट इथली नोकरी घेणरेही आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच सॉफ्टवेअर कंपन्यातून येणारे बरेच भारतीय आहेत. सगळ्यात छोटी कम्युनिटी ही पिएचडी किंवा पोस्ट डॉक्टरेट करणाऱ्यांची आहे. प्रत्येकाचा व्हीसा वेगळा, प्रत्येक व्हीसाच्या कटकटी वेगळ्या. ग्रीन कार्डासाठी अर्ज केल्यावर प्रत्येक व्हीसानुसार लागणारा कालावधीही वेगळा. त्यात वकीलांचे अनुभवही प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. इथे नोकरीनिमित्ताने मिळणारा पैसाही कोणाला कमी तर कोणाला जास्त आहे. शिवाय शिष्यवृत्तीही वेगवेगळी आहे. J1, H1, B1, O1, यांच्या डिपेंडंट लोकांचे व्हीसेही वेगळे आणि त्याचा कालावधी, अटीही वेगवेगळ्या. काही डिपेंन्डंट व्हिसावर नोकरी करण्यासाठी वेगळे परवानगी मिळते तर कोणाला नाही. यात H4 व्हिसावर नोकरी करता येत नाही. शिक्षण घेता येते. या व्हिसामध्ये तुम्हाला घरीच बसावे लागते. काही जण इथे बेकायदेशीर नोकरी करून पैसे मिळवतात. नुसते पैसे मिळवणे हा उद्देश्य नसतो तर त्यात वेळ घालवणे हा पण हेतू असतो. शिवाय नोकरी देणारा व घेणारा या दोघांनाही गरज असते. पण अशी बेकायदेशीर नोकरी पकडली गेली तर मात्र तुमची रवानगी थेट भारतात होते. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव इथे परत येता येत नाही.










या एच ४ व्हीसावर ज्या बायका असतात त्या काहीतरी मार्ग शोधतात किंवा निवडतात. काही जणी शिक्षण घेतात, तर काही जणी बेकायदेशीर नोकरी वेळ घालवण्यासाठी किंवा थोडाफार पैशाचा हातभार लावण्यासाठी करतात. तर कोणी आपापले छंद जोपासतात. नाहीतर दिवसभर ऑनलाईन जो कोणी दिसेल त्यांच्याशी गप्पागोष्टी करतात. काही जणी वेळ जाण्यासाठी लायब्ररीत जाऊन काम करतात तर काही जण इथे लायब्ररीत मिळणारी पुस्तके वाचून काढतात. काही जणी कार शिकून कार मधून भटकंती करून वेळ घालवतात. इंटरनेट या प्रभावी माध्यमामुळे आजकाल जगाच्या पाठीवर असलेले सर्व मित्रमंडळी, नातेवाईक बोलू शकतात, वेबकॅमवर एकमेकांना बघू शकतात, अर्थात इच्छा असेल तर. नाहीतर वेळ होत नाही असे सांगितले जाते. इथेही प्रत्येकजण काही ना काही करतच असतो. दोघेही नोकरी करून दोन मुले सांभाळणे म्हणजे काही जोक नाही पण भारतातले भारतीय म्हणताना दिसतात की तिथे काय यंत्र आहेत ना कामे करायला,, हो आहेत पण ती चालवायला लागतातच. आपोआप यंत्रे चालून कामे होत नाहीत. इथेही हेक्टीक जीवन आहे फक्त वेगळ्या प्रकारचे. हवामान चांगले असल्याने जास्त दमायला होत नाही पण तितकाच हवामानाचा वाईट परिणामही आहे. जिथे बर्फ पडतो तिथे खूप डिप्रेशन येते. शिवाय दोघेच्या दोघे असल्याने तोच तो पणा येतो. काही ठिकाणी जिथे कोणीही भारतीय नाहीत अशी काही शहरे आहेत. तर काही ठिकाणी बरेच भारतीय असूनही एकटेपणा आहेच. इथे आलागेला प्रकार नाही, तसा तो भारतातही हल्ली कुठे राहिला आहे? हल्ली सर्वच ठिकाणी प्रत्यक्षात न भेटता, किंवा कोणाच्या घरी न भेटता ऑनलाईन, होटेलमध्ये किंवा पार्कात परस्पर येऊन भेटणे झाले आहे. घरी येणे जाणे, किंवा घरी जेवणे हे प्रकार बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत. सर्व जण चार हात दूरच राहणे पसंत करतात मग तो भारत असो नाही तर परदेस.


क्रमश:....

8 comments:

सौ. अवनी अंकुर राजोपाध्ये said...

रोहिणी ताई,
पुन्हा एक उत्तम लिखाण वाचण्यात आले तुझे.. H4 वर असलेल्या बायका काय काय करतात याचे वर्णन वाचून हसायलाच आले. बराच रिसर्च केला वाटतं तू.. एकूणच फक्त अमेरिका आहे आणि म्हणून त्यायोगे केलेला स्वैर विचार एवढेच एका देशाबद्दल मर्यादित नसून, त्याचे खरे स्वरूप अगदी योग्य प्रकारे सांगितले आहेस. मान्य आहे कि इथे स्वच्छता आहे, निसर्ग चांगला आहे(अर्थात काही राज्यात तो नाही), किंवा एक डॉलरला पन्नास रुपयांचा फायदा जरी दिसत असेल तरी याही देशाचे फायदे तसे तोटेही आहेत, याचे मार्मिक वर्णन केले आहेस लेखात..
पण लेख जरा घाई घाईत लिहून उरकल्यासारखा वाटला.
काही नमुने -
-म्हणजेच फक अमेरिका आहे
-ठाणे राज्यातील डोंबिवली शहर हे
ठाणे विभागात डोंबिवली शहर असे म्हंटले असते तरी चालले असते. ठाणे राज्य नाही गं. जिल्हा आहे ना..
-इथली नोकरी घेणरेही आहेत
- पण अशी बेकायदेशी नोकरी


घाई गडबडीत होते असे. पण अर्थात यामुळे लेखाची मजा अजिबात गेलेली नाहीये ! तुझा हा लेख तितक्याच ताकदीने आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झालाय, हे नि:संशय !
पण अशाप्रकारच्या चुका तुझ्या लिखाणात कधीच झाल्या नाहीत. त्यामुळे नेहमीच तुझ्या "शुद्ध" लिखाणाची सवय झालेल्या आम्हा वाचकांना त्याचा जरासा त्रास होतो एवढंच !
आणि लेखात हे क्रमश: कसे आले.. ? अशी वाट पाहायला लावायची नाही ! हुरहूर लावायची नाही अशी..

- सौ अवनी.

rohinivinayak said...

ho ga Avani, yess, manya kharech chuka jhalya aahet,, neet karte tya,, aani aga ashya baryach lekhamadhe aahet asha chuka,, ghait type kela aahe, aaj khare tar khupach kantala aala hota mhanun ashya prakare man mokle kele aahe,, he aani asech barech kahi lihayche aahe,, thanks a lot avani,, nehmipramanech savittar aani mudesud abhipray khup aavadun gela,, aani vachtes hi pan mazya aanandat kayamchi bhar ghatles tu,,

mau said...

रोहिणी,खुप सुंदर लिहिला आहेस लेख..खरच आहे हल्ली भारतात सुद्धा कोणी कोणाला भेटायला तयार नसतात.हात राखुन रहातात.भेटीगाठी सुद्धा ऑनलाईन..ते सुद्धा मुडवरुन ठरले असते.चालायचेच...पुर्वीचे दिवस रहाणार नाहीत हे पक्के..प्रत्येकाने आपापला मार्ग शोधावा आणि आनंदित रहावे..

rohinivinayak said...

Thanks Uma,, khare aahe, purviche divas aata parat yene shakyach nahi,, mhanunach sarv kahi asunahi lok sukhi nastat,, sukh dukkha donhi share karayla pahijet mag tumhi jagachya pathivar kuthehi ka asena,,

Nisha said...

Far chan lekh aahe - Pardeshat rahanarya lokanchi majjja aahe ase baryach lokana vatate - pan mhanatat na jyacha jalata tyala kalata kinva durun dongar sajare ...
Aamhala tar ethe barech not so gud anubhav pan aale aahet - specially indian (specifically marathi) lokankadun - Everyone tries to judge u based on your position, money, size of ur house and car etc and not based on ur nature/knowledge/talent... It really hurts - Survatila australia la aalyavar tar kahi marathi mulinkadun far vait anubhav aale - they just ignored me when I tried to make friedship with them because we were new in the coutry that time and not well settled etc.. Barach vel dyava lagla mala he kalayla ki lok kase astat.. Aata tar kahich problem nahiye - we hv friends and other things to do and we are settled now but whenever I think of those days 3 years back it always brings tears in my eyes ... anyways life goes on and bad memories become a lesson you have learnt :)

rohinivinayak said...

निशा,, अगदी खरे आहे,, लोकांना फक्त परदेश दिसतो,, तिथे मिळवले जाणारे पैसे दिसतात,, पण इथले जीवन आणि येणारे अनुभव कोणीही विचारत नाही. not only that भारतभेटीत तर काही जण सोडल्यास कोणालाही त्याचे सोयरसुतक नसते. आणि नुसते जे फिरायला येतात त्यांना परदेश चांगला वाटणारच. इथे स्वतःच्या हिमतीवर या अनुभव घ्या आणि मग बोला परदेशाबद्दल. आम्हाला आत्तापर्यंत मराठी लोक भेटलेले नाहीत. अगदी क्वचित काही सोडले तर, पण बाकीचे तेलगू मित्रमैत्रिणी भेटले त्यांचे अनुभव आम्हाला चांगले आलेले आहेत. आम्हाला आत्तापर्यंत एकच मराठी मैत्रिण भेटली जी आम्हाला आधीपासून माहित नव्हती म्हणजे एका संकेतस्थळावर ओळख झाली. ती आमच्याकडे येऊन राहून गेली व आम्हीही तिच्या घरी दोन वेगळ्या घरी एकेकदा जाऊन राहून गेलो. तिच्याकडे खूपच मोकळेपणा वाटतो. तिला आता दोन मुले आहेत म्हणून तिला आमच्या घरी येता येत नाही, नाहीतर नक्की आली असती रहायला. नुसतेच फिरायला जाऊन देशातील इतर ठिकाणे बघणे हे तर झालेच पण कोणाच्या घरी जाऊन मोकळेपणाने राहणे, बोलणे यातही समाधान, वेगळेपणा आहे आणि तोही परदेशात आवश्यक आहे. या मैत्रिणीप्रमाणेच अजून एक विनायकचा मित्र आहे की जो भारतापासूनच मित्र आहे. त्याचे घरही असेच आहे. त्यांच्याकडे जाऊन राहिलो तर खूप मोकळेपणाने गप्पा होतात आणि त्यामुळेही मन ताजेतवाने होते, फक्त हा मित्र व त्याचे कुटुंब आमच्याकडे अजून आलेले नाही. बाकी मराठी ऑनलाईन ओळख झालेले आमच्याकडे आम्ही बोलावूनही कोणीही येत नाही. त्यामुळे आम्ही ठरवून टाकले आहे की कोणीही बोलावले तरी जायचे नाही. खूप खूप अनुभव आहेत गाठीशी.


आम्ही जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेव्हा आम्हाला तीन तेलगू कुटुंब भेटली त्यांचे आमचे इतके छान जमले होते, ते मी डेंटनचे दिवस या लेबलमध्ये लिहिणार आहे. बाकी क्लेम्सनला पण काही कुटुंब होती (मराठी नाही) व त्यांचे व आमचे पण जाणे येणे, गप्पा मारणे, पॉटलक होत होते. आम्ही ज्या शहरात राहतो तिथे भारतीय वस्ती जवळजवळ नाहीच. त्यामुळे एकटेपणा आला आहे. तरीही मी ऑनलाईन झालेल्या मैत्रिणींशी गप्पा मारते फोनवरून हे ही नसे थोडके! निशा, सविस्तर प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद,,, व तू माझे लिखाण आवर्जून वाचतेच व सविस्तर अभिप्रायही देतेस त्यामुळे मला खूप छान वाटते,, तुझ्यासारख्याच अजून काही मैत्रिणी आहेत. अशा निखळ मैत्रीचा मी आनंद घेत असते.

rohinivinayak said...

nisha tuza anubhav vachun vaait vatle,, marathi lokanchi marathi lokanshi ase vagave? aani mhane "marathi paul padate pudhe" asech ka paul pudhe padate? mhantat na gharoghari matichya chuli :) thodyaphar pharkane saglikadche anubhav eksarkhech,,, this is part of life,,

Nisha said...

true Rohinitai

agadich sagale marathi vait nahiyet ethe - kahi bare aahet tase pan maximum loka titpatach vatale :)