


पिवळे पान अगदी फुलासारखे दिसत आहे ना? आज सकाळी पाहिले तर मागच्या अंगणात पडले होते उलटे. सुलटे केले तर खूप छान दिसले म्हणून फोटो घेतला. जांभळा व निळा रंग पाण्यावर दिसत आहे त्या आहेत आकाशातील रंगांच्या छटा. आमच्या इथे एक नदी आहे तिथे आम्ही दर रविवारी फिरायला जातो. फुले, सुर्यास्त, आकाशातील रंग काही ना काही वेगळे दिसतेच.