आजचा दिवस छान गेला. मनोगती कुटुंब मैत्रिण सोनाली तिच्या कुटुंबासह दुसऱ्या राज्यात नवीन शहरी जाणार म्हणून मी तिला जेवायला ये असे निमंत्रण दिले. ती म्हणाली खूपच कामे आहेत. उद्या म्हणजे आज येऊ का? तर मी म्हणाले ये. विनायकची भेट होणार नाही कारण तो ऑफिस मध्ये जाणार. पण तरीही तुझी माझी भेट होईल. नंतर आम्ही तुझ्या नवीन घरी येऊ. आम्ही २००५ सालापासून फोनवर बोलत आहोत. एकमेकांची चौकशी करतो. आत्तापर्यंत आम्ही ४-५ वेळा भेटलो असेन. ती व आम्ही खूप दूरवर रहात होतो. एकदा भारतभेटीत भेटलो. सध्या एकाच शहरात आहोत. त्यामुळे आमचे भेटणे ठरले. ती म्हणाली की जेवायचे नका करू. मी तास-दोन तास बसून जाईन. मग विचारले की तुला काय आवडते? बटाटेवडे , साबुवडे तसे करते. तर ती म्हणाली कशाला करत बसता घरी. तुम्हाला चालत असेल तर बाहेरच जेवू. मी लगेचच होकार दिला. तिला म्हणाले की बाहेर पाणीपुरी खाऊ. एका उपाहारगृहात पाणी पुरी, भेळ, शेवपुरी मिळते. तर तिथे गेलो. पाणी पुरी, शेवपुरी, जालफ्रेजी, पोळी असे जेवलो. फोटो काढले आणि तिने मला घरी सोडले.
आजचा दिवस घटस्थापनेचा म्हणून साडी नेसायचे ठरवले. नेसावी का? नेसू नये? यावर तळ्यात मळ्यात झाले. त्यानिमित्ताने आईने दिलेली साडी नेसून होईल म्हणून नेसले आणि खूपच बरे वाटले. नाहीतर साडी नेसणे हल्ली नकोच वाटते ! मला खरे तर मनापासून साडी नेसायला आवडते. पण तरीही ती तितकी नेसली जात नाही. भारतात असताना पण नाही आणि इथेही नाही. ती माझ्या घरि येईपर्यंत मी नवरंगांची जी गाणी ठरवली होती ती परत युट्युबवर पाहिली आणि काही ठरवलेली बदलली. त्यामुळे माझे समाधान झाले आहे. एक दोन गाणि मेल सोलो होती. पण आता मला ९ गाणी लता मंगेशकरची आणि त्या त्या रंगांची मिळाल्याने छान वाटत आहे. सोनालीला काम असल्याने तिला जर सकाळी जमले नाही आणि ती जर संध्याकाळी आली तर साबुदाणे वडे करायचे ठरवले होते म्हणून सकाळीच साबुदाणा भिजत घातला. घरी आल्यावर खूपच कंटाळा आला होता. त्यामुळे रात्री मुगडाळ खिचडी, गाजर-टोमॅटो कोशिंबीर केले. कालची एक पोळी आणि भात उरला होता त्याची फोपोभा करून खाल्ला. कालची भरली कारली संपवली व अशा रितीने आजचा दिवस खूप वेगळा आणि छान गेला. स्मरणात रहावा म्हणून रोजनिशीमध्ये लिहिला.
No comments:
Post a Comment