आज मी आमचा छोटा खजिना उघडला आणि व्यवस्थित लावला. माझ्या आठवणींचे एक गाठोडे तयार आहे. त्यात मी वहीत पेनाने लिहिलेले बरेच काही आहे. अश्या २५ वह्या आहेत. शिवाय कागदावर रेखाटलेले आहे. पॅरालीगलच्या २ सेमेस्टर मधल्या नोट्स, असाईनमेंट्स आहेत. दुसऱ्या गाठोड्यात आज मी कॅसेट आणि सीडीज व्हिसिडीज नीट लावल्या. आठवणीत रमले. या गाठोड्यात अजुनही काही भरले जाईल. या सर्व साठवलेल्या आठवणी मी कधीच फेकून देणार नाही. अजुनही बरेच काही जमा होईलच की जे कधीच टाकून दिले जाणार नाहीये.
Rohini Gore ....
No comments:
Post a Comment