Saturday, May 14, 2011

१४ मे २०११

आज कधी नव्हे ते farmers market ला जाण्याचा मुहूर्त लागला. शनिवारी सकाळी उठून कुठे बाहेर जाणे म्हणजे कंटाळवाणेच. आता हळूहळू उन्हाळा जाणवू लागला आहे. आज हवा अजिबात चांगली नव्हती.




तर त्या मार्केटला गेलो तर ते विशेष काही चांगले वाटले नाही. आम्ही दोघेही भाजीप्रिय , वाटले होते ताज्या भाज्या मिळतील. काही होत्या तिथे भाज्या पण खूप थोड्या. जास्त करून तिथे बागेत लावण्याकरता रोपटी खूप होती. एका स्टॉलवर स्ट्रॉबेरी, ब्ल्युबेरी व रासबेरी दिसली. छान टवटवीत दिसत होती. घरी आल्यावर खाल्ली व खूप ताजेतवाने वाटले. बरेच दिवसानंतर मी त्याचे सॅलड डेकोरेशनही केले.






आजकाल आम्हाला मेक्सिकन फूड आवडायला लागले आहे. आज तिथे जाण्याचा वार होता व तिथून एका तलावावर जाणार होतो पण गेलो नाही. हवा अजिबात चांगली नव्हती. गरम आणि दमट हवा एकत्रित म्हणजे अजिबात चांगली नाही. घरी आलो आणि आपलीमराठीवर एक चित्रपट पाहिला. गाभ्रीचा पाऊस. अतिशय छान चित्रपट. मराठीत इतका चांगला चित्रपट पहायला मिळत नाही इतका सुंदर. खेडेगाव, शेती, पाऊस येत नाही म्हणून पीक नाही. हे सर्व वातावरण अतिशय चांगले उभे केले आहे. एक चांगला चित्रपट पहायला मिळाला याचा आनंद झाला.





फार्मर्स मार्केटला पण जी फळे घेतली ती मस्त होती चवीला त्यामुळेही दिवस छान गेला. पण का कोण जाणे दुपारचे मेक्सिकन जेवणाची जास्त मजा नाही आली, नाहीतर मी तर खूप कौतुक करत असते खूप छान वाटले, जेवण छान होते असे कौतुक चालू असते माझे. शनिवार हा ग्रोसरीवार असतो पण तिथेही गेलो नाही. नाही म्हणायला रात्रीची मिक्स भाजी व पोळी छान झाली. ही मिक्स भाजी रेसिपी लिहिणार आहे लवकरच. स्ट्रॉबेरी, ब्ल्युबेरी व रासबेरीचे नैसर्गिक रंग मनात भरून राहिले आहेत. ते तुम्हाला उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म या माझ्या ब्लॉगवर पहायला मिळतील.

4 comments:

mau said...

yeu de lavakarch reciepe..wat pahatey...:)

rohinivinayak said...

ho :)

Nisha said...

Hi Rohini, I cant see your food blog - Udarbharan nohe... could you please help

rohinivinayak said...

ohh, I do not know why you could not see my recipe blog. here is the link, may be it will helpful to you.

http://www.rohinivinayak.blogspot.com/

copy paste the link and you will be able to see it. on my smruti blog also you can find blog link on the right hand column. thanks.