Friday, July 08, 2022

८ जुलै २०२२

 २०२२ रोजनिशीतले आजचे हे पहिले पान. मी २०११ सालापासून रोजनिशी लिहित आहे. रोजनिशी म्हणजे रोजच्या रोज नाही. असेच एखाद वेळेस काही वेगळे घडले. कोणत्या गोष्टीपासून काही आनंद झाला तर ती गोष्ट थोडक्यात लिहायची असे ठरवले आहे. मागच्या काही वर्षातली रोजनिशीतली पाने एखादवेळेस चाळली की अरे, या दिवशी आपण हे केले होते का? असे आठवून परत आपल्याला आनंद होतो. तर आजची ही रोजनिशी म्हणजे आज मी बाहेर गेले होते. एखाद्या दिवशी जाते बाहेर आणि काही दुकाने हिंडते. बघण्यात वेळ जातो आणि एखादे चांगले मिळून जाते. तर आज मी कानातले घेतले ते म्हणजे पेपरोनी पिझ्झाचे स्लाईस. टार्गेट मधे मी सहसा जात नाही. हेंडरसनविलला असताना तिथल्या मॉल मध्ये जायचे. इथे कोल्स आणि आता टार्गेट मध्ये जाते काही वेळेला.

आधी पिझ्झा खाते, कोक पिते आणि मग फिरते इकडे तिकडे. मला कानातले बघायला आणि खरेदी करायलाही खूप आवडते. आज मी केसाला लावायचा कंगोरा सारखा दिसणारा चाप पण घेतला, पहिल्यांदाच. घरी येवून लावून पाहिला तर चांगला वाटला. केस मोकळे सोडण्यापेक्षा काही वेळा आता मी चाप घेणार आहे. कानातली मस्तच होती. त्यात एक ट्र्क होता. शिवाय झाड ,काचेचा स्टाईलिस्ट ग्लास, आयस्क्रीम कोन होता. आणि दुसऱ्या एका दुकानात केकचा तुकडा पाहिला. गोगलगाय पाहिली. शिवाय घुबड होते. कुलुप, किल्ल्या, घड्याळ असेही कानातले होते. सेफ्टी पीना, कणीस, अननस, असे बरेच काही ! हे सर्व कानातले होते आणि असतात. वेगवेगळे प्रकार बघायलाही छान वाटतात. सेल असेल तर मी घेते. मला १३ डॉलर्सचे ७ मध्ये मिळाले म्हणून घेतले. मधे एकदा पक्षी आणि बगळाही घेतला होता.

माझ्या मैत्रिणीने मला मोर दिला ! खूपच छान आहे तो ! तर माझ्याकडे बरेच कानातले झाले आहेत. ते आहेत अनुक्रमे  २ कासवे, २ हत्ती, रासबेरी, कॉफी मग, ३-४ प्रकारची फुले, मासे, २ फुलपाखरू, २ बदाम, भोपळा, निवडुंग, विंचू, बाटल्या, पक्षी, बगळा



5 comments:

मिलिंद कोलटकर said...

लिहित रहा! आपले लेख, फोटू, विचार, ते मांडण्याची पद्धत आवडते, भावते. एका वेगळ्या विश्वाची सफर घडते. धन्यवाद.

rohinivinayak said...

Thank you so much !!! :)

Anonymous said...

kharach tujhe kanatalyache designs bhari ch ahe.. gammat mhanje mi ase dhinchyak designs che kanatale kadhich ghetle nahi.. pan tuze collection pahun mala maja vatli.. tujhe man agdi lahan mulagat ahe ase vaatle. chhotya mulanna kase kadhi kahi awadun jail, patta nasto.. ani tujhe collection ek donda tujhya kanat pahilyawar tar mala vatle ki kharach ahe, kiti chhan ani navin look detat he kanatale.

- sau. avani

rohinivinayak said...

अवनी, मी इथे दुकानात फिरते तेव्हा मला हे असे वेगळे कानातले दिसले एका दुकानात. तेव्हापासून मला असे वेगवेगळे कानातले घ्यायचे वेडच लागले आहे ! मी जेव्हा इंगल्स मध्ये नोकरी करायचे तेव्हा असे वेगवेगळे कानातले घालून जायचे. तिथे काम करणाऱ्या बायकांना पण खूप आवडायचे. अनेक धन्यवाद अवनी प्रतिसादाबद्दल !

rohinivinayak said...

मिलिंद राव,, तुम्हाला माझे लेख आवडतात हे वाचून खूपच उत्साह आला आहे आणि आनंदही वाटला ! अनेक धन्यवाद !!