बालकनीत उभे राहून मी आकाशातील बदल नेहमी बघत असते. सूर्योदयापेक्षाही सूर्यास्ताचे फोटो मी बरेच घेतले आहेत. सूर्योदयाचे त्यामानाने खूपच कमी आहेत. पहाटे जाग आली तरच ते मि घेते.
या लेखातील जे फोटो आहेत त्याबद्दल मला सांगायचे आहे. दूरचित्रवाणीवर १४ न्यूज कॅरोलायनावर आम्ही सतत बदलणारे हवामान पाहत असतो. तिथे रोज एक फोटो हवामानाचा दाखवतात. मला विनायकने सुचवले की तू इतके फोटो काढतेस तर पाठवत जा या चॅनलला.
तर एकेदिवशी मी या चॅनलला सूर्यास्ताचा फोटो पाठवला. त्यांनी तो लगेच ४-५ दिवसांनी दाखवला. नंतर सूर्योदयाचे दोन पाठवले तेही दाखवले. आणि एक सूर्योदयाचा फोटो १४ न्यूज कॅरोलायना या त्यांच्या वेबसाईट वर लावला आहे. आता मी फोटो पाठवत रहाणार.
मी असे चांगले बरेच फोटो पाठवत असते त्यातले हे तीन त्यांनी दाखवले. अर्थात हवामानाच्या संदर्भातच हे फोटो पाठवायचे असतात. १४ न्यूज कॅरोलायना या चॅनल वर रोज वेदर शॉट ऑफ द डे दाखवतात. मी रोज दाखवणारे फोटो पाहत असते.
Thanks to Lee Ringer, Meteorologist, 14 News Carolina !
No comments:
Post a Comment