Monday, September 10, 2012

Fort Fisher Sea Beach















 फोर्ट फिशर या समुद्रकिनाऱ्यावर काल फिरायला गेलो होतो. हा किनारा मला खूप आवडतो. इथे वाळूत बसणे होते. शिवाय इथे खडकावर बसून व उभे राहून समुद्रातील लाटांना पाहता येते. काल तूफानी वारे होते. वाळू उडत होती व लाटा उसळल्या होत्या. वाऱ्याने लाटा उलट्या होत होत्या. खूप छान वातावरण होते. समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने एक छोटा रस्ता जातो त्यामुळे त्यावरून चालणे होते. चालताना एकीकडे भव्य समुद्रही दिसतो. पाण्यात तयार झालेले वेगवेगळे रंग छान दिसतात. त्या रंगांचे एका मागोमाग असे थर दिसतात. मातकट रंग, निळा , हिरवा अशा छान छटा दिसतात. वेगवेगळ्या कोनातून या समुद्राला पाहता येते. इथे सीगल्स असतात. वाळूत लहान मुलांनी छान कलाकृती केलेल्या बघायला मिळतात.



2 comments:

  1. Anonymous12:18 PM

    Photo pahatana kaanat laatancha awaaj aiku ala....kitti shanta anhi sundar ahe hi jaaga.

    - Priti

    ReplyDelete
  2. thanks priti,, mala ha beach khup aavadato !!!

    ReplyDelete