Thursday, March 01, 2012
वास्तू (३)
आईने घरी घालायचे मॅक्सीही खूप शिवलेले आहेत. मॅक्सी हा कपड्यांचा आटोपशीर प्रकार होता. त्यात अम्रेला कट असायचे. फ्रॉकमध्ये चुण्याचुण्याचे व प्लेटीचे फ्रॉक असायचे, कधी कधी बॉक्स प्लेटीचेही! गळ्याला व खाली फ्रॉकला झालर असायची. आईचे ब्लाऊजही आई घरीच शिवायची व त्याला काजेही घरीच करायची. आम्ही दोघी बहिणी ब्लाऊजला व ड्रेसला बटणे आणि हुकलूप लावायचो. घरी सिंगचे मशीन होते. या मशीनला एक ड्रॉवरही होता. त्यात रिळे, सुया , टेप व कात्री ठेवलेली असायची. मशीनचे काम जेव्हा नसेल तेव्हा ते मशीनलाच असणाऱ्या लाकडी चौथऱ्यावर उपडे करून ठेवायचो. हे मशीन बाहेरच्या खोलीत होते आणि ते स्वयंपाकघरात येणाऱ्या दाराच्या बाजूला आडवे ठेवलेले होते. त्याखाली एक लाकडी स्टुलही असायचे.
मशीच्या वरती भिंतीवर एक काचेचा आरसा लावला होता. त्या काचेवरच कोरलेली नक्षी होती आणि त्याला लागून काचेचीच आडवी पट्टी जोडली होती. त्यावर पाँड पावडरीचा मोठा डबा एका बाजूला. त्याशेजारी एक छोटा प्लॅस्टीकचा डबा. मोठ्या डब्यातील पावडर आम्ही त्या बाजूला असणाऱ्या प्लॅस्टीकच्या डबीत काढून ठेवायचो. हा डबा गोल आणि त्याचा रंग होता गुलाबी आणि झाकण होते लाल. त्यात एक निळा छोट्या आकाराचा स्पंज होता. त्याने पावडर लावायचो. जाईचे काजळ होते. अफगाण स्नो होता. ओले श्रुंगारचे लाल व काळे कुंकू होते. लाल आईकरता व काळे आमच्याकरता. शिवाय २ कंगवे व एक फणी होती. मोठा कंगवा आमच्या तिघींसाठी व एक लांब निमुळता कंगवा बाबांचा होता. मिसळीच्या आलेल्या उवा व लिखा काढण्यासाठी एक फणी होती. शाळेला वेणी घालून जायचे असेल तर त्याकरता काळ्या रिबिनी होत्या. रिबिन्या बांधून लांब पेडाच्या वेण्या आई घालायची. पेडाला शेवटी शेवटी रिबिनी बांधून थोडे उरलेले पेड घालून त्याला रिबिनीच एक गाठ बांधायचो आणि मग ती वर कानामागे पेंडांना घट्ट आवळून बांधायचो. या रिबीनीची वर एक गाठ बांधली की मग उरलेली रिबीन एखाद्या फुलाप्रमाणे आकार देवून बांधायचो. शाळेच्या व्यतिरिक्त बाहेर जाताना लाल, गुलाबी, पिवळ्या व पांढऱ्या व निळ्या रिबीनी होत्या.
आई आमच्या वेण्या घालायची त्यातही बरेच प्रकार होते. दोन वेण्या, चार वेण्या, झोपाळे, बटवेणी, एक वेणी. गोंड्याप्रमाणे थोडे केस पेडीच्या खाली असेच सोडून द्यायचो त्या म्हणजे गोंड्याच्या वेण्या. रिबीनी जाऊन रबरे आली. वेगवेगळ्या प्रकारचे चाप आले, क्लिपा आल्या. माझी बहीण वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिपा कानामागील केसांना लावायची. तिला त्या छान दिसायच्या! मला मात्र क्लिपा हा प्रकार आवडला नाही आणि माझे केस पातळ व मऊ असल्याने त्या बसायच्याही नाहीत. दर रविवारी आई आम्हा दोघी बहिणींना नहायला घालायची. त्याकरता शिकेकाई उकळली जायची. कधीकधी रिठे. अंघोळीकरता पाणी आधी स्टोव्हवर तापायचे. त्या आधी बंब अंगणात होता. त्यात लाकडे जाळून बंब पेटवायचो व त्यातले पाणी अंघोळीकरता घ्यायचो. गॅस आला व त्यानंतर सर्व काही गॅसवरच. नंतर बंबाला कॉईल लावून घेतली. त्यानंतर तर अंघोळ म्हणजे खूप आनंद होता. भरपूर पाणी घ्या. आंम्ही तर चांगल्याच डुंबायचो भरपूर पाणी घेऊन. त्यामुळे नहाणे तर खूपच छान होत होते. केस धुतल्यावर आई केस पंचाने गुंडाळून त्याचा मोठा अंबाडा घालून द्यायची. हा अंबाडा बराच वेळ राहू द्या म्हणजे केस कोरडे होतील असे आई म्हणायची. बऱ्याच वेळानंतर पंचाने बांधलेला अंबाडा सोडला की केस पंचानेच खसाखसा घासायचे व नंतर पंचानेस केस उलटे करून झटकायचे. त्या दिवशी नंतर आई आमच्या केसातल्या जटा काढून सैलसर एक वेणी घालत असे.
क्रमश:
अफगाण स्नो..मला अजुन आठवते ती डबी..मध्यंतरीच स्वदेश म्हणुन एका कंपनी कडुन आलेली ही डबी..मस्त वास यायचा ह्या स्नो ला..बाकी तु आठवणीत मस्त रमतेस गं..
ReplyDeleteरोहिणी ताई,
ReplyDeleteखूपच वाचनीय झाले आहे हे लिखाण.. त्यामुळे झाले काय कि माझ्याही लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात.. बाकी, रिबीन घालून वेण्या किती सुंदर दिसतात नाही.. माझे केस छान गुडघ्या पर्यंत लांब होते १२वी पर्यंत.. आणि खूप जाड.. त्यामुळे माझे केस धुणे वाळवणे, मग खूप तेल लाऊन त्याच्या वेण्या घालणे खूप जिकीरीचे काम होऊन जाई आईला.. आणि आमच्याकडेही सिंग ची मशीन होती.. आईने आमचे खूप फ्रॉक त्यावर शिवले.. नंतर नंतर तर पंजाबी ड्रेस पण शिवलेत.. मशीन अजूनही आहे घरी.. अजूनही आई करते त्यावर काम.. आणि नंतर ते तुझे कपाटाचे वर्णन.. Ponds च्या पावडरीचा डबा आणि त्यातून छोट्या डबीत पावडर काढणे.. मला एकदम शाळेचेच दिवस आठवायला लागले.. एकूणच खोलीचे वर्णन इतके सचित्र झाले आहे कि डोळ्यासमोर ती खोली उभी राहिली नाही तर नवल.. इतके सजीव लिखाण केले आहेस.. वा.. अगदी सलाम.. कारण डोळ्यांसमोर साक्षात देखावा निर्माण करण्याची जबरदस्त ताकद आहे तुझ्या लिखाणात !!
लौकर पुढचा भाग टाक.. जास्त वाट पाहायला लाऊ नकोस..
- सौ. अवनी
सुसंगत आणि अतिशय वेचक, वेधक लेखन. खूप बारकाव्यांसहित लिहिलं आहे हे पाहून कौतुक वाटलं. रोचक आणि वाचनीय!!
ReplyDeleteतुमच्या 'स्मृती' चं कौतुक वाटतं!! इतके बारकावे लिहिले असले तरीही अत्यंत रोचक, वेचक, वेधक लेखन आहे!
ReplyDeleteसहज जाताजाता एक सुचलं म्हणून लिहितो - इथे पुण्यातच राहूनसुद्धा 'नॉस्टालजिक' वाटाव्या अशा जागा / गोष्टी दिवसेंदिवस कमीच होत चालल्या आहेत. कधीकधी खूप आश्चर्य वाटतं! असो!
nehmi pramanech barik ani detailed athvani tajya zalya . ribini athavlya mala hi. mala ajibaat avadaychya nahit shalechya ribini . amchya veli tar ashiki picture pahun taslya nilya ani tyawar pandhrya tiklya aslelya ribini famous zalya hotya tya matr mala avadaychya. jai kajal athavle. PONDS cream pan ..
ReplyDelete- Pallavi
pallavi, uma, avani, sandeep,abhipray vachun khup chhan vatle,, tumchya aathvanihi aavadlya, manapasun anek dhanyawaad!!!!
ReplyDeleteRohini Tai, Saaglyani mhantlya pramanech majhyahi athvani pan taajya jhalya. Aaine shivele frock va dress, arshya samor ponds va fani-kangve, shaletlya ribbini va venyanche prakar! :D Ravivari aaine premani bhijavlel rithe va shikakai anhi kesan karta aslela toh pandhra pancha! Asa vatta me majhyach lahanpanachya athvani vachtye. :)
ReplyDeleteTumchya vastuche varnan kadhich sampu naye asa vatta.
- Priti
Thanks priti! ;)
ReplyDelete