Tuesday, June 14, 2011

१४ जून २०११

आजकाल मी सकाळी चहापाणी झाले की तळ्यावर चक्कर मारायला जाते नाहीतर दुपारी जेवण झाल्यावर जाते. पूर्वीची मजा आता तळ्यावर राहिलेली नाही. एक तर मला आवडणाऱ्या बदकांची संख्या खूप कमी झाली आहे. पूर्वी माझा तळ्यावर संध्याकाळी तासभर खूपच छान जायचा.






एका बदकीणीला सात आठ पिल्ले झाली आहेत. त्यांची चक्कर आमच्या अपार्टमेंटच्या समोरच्या हिरवळीवर असते. संध्याकाळी खिडकीतून पाहिले की दिसतात मला ती आणि मग मी ब्रेड घेऊन जाते. ही बदके आणि त्यांची पिल्ले भात खातात हे मी एकदा पाहिले होते. आमच्या शेजारी एक चिनी राहतो तो बरेच वेळा त्यांना भात घालतो. परवा रात्री मि भात केला होता आणि तो भातामध्ये पाणी जास्त झाल्याने कूकरमध्येच बाहेर आला होता तो भात मी बदकपिल्लांना घालायचे असे ठरवले होते म्हणून सकाळी तळ्यावर गेले. तळ्यावर सामसूम होते पण अगदी काही सेकंदाने मी उभ्या असलेल्या छोट्या झुडुपातून बाहेर आली पिल्ले व बदकीण. अरेच्या तुम्ही इथे आहात होय? मला खूप आनंद झाला. लगेच आली तुरुतुरू धावत ब्रेड खायला. आधी ब्रेड घातला मग भात. भात पण आवडीने खाल्ला! शीत न शीत वेचून खाल्ले. मला खूप छान वाटले की घरचा भात खाल्ल्ला म्हणून. लगेच एक शुटींगही घेतले.






एक सुरेख गुलाब फुलला होता त्याचाही फोटो घेतला. करदळीसारखी दिसणारी पाने आणि त्यांना येणारी लव्हेंडर रंगाची फुले यांचे पण मी फोटोज घेते. आज गोलाकार छान कळी होती त्यांना त्याचा फोटो घेतला. बरेच दिवसांपूर्वी राहिलेले काम केले मी आज. डिव्हिडी प्लेअर चालू करून त्यावर पूर्वी घेतलेल्या सीडीजवर माझ्या आवडीची गाणी रेकॉर्ड केली आणि मनसोक्त ऐकली सोफ्यावर पडून व डोळे मिटून. खूप छान वाटले आज.





आज बरेच बरेच दिवसांनी संध्याकाळी खायला साबुदाणा खिचडी केली होती त्यामुळे खूप छान चव लागली. चव खूप रेंगाळत होती जिभेवर. असे वाटले अजूनही खूप खावी. तशी मला व विनायकला साबुदाणा खिचडी खूपच प्रिय आहे. आजचा दिवस खूप वेगळा आणि चांगला गेला. समाधानात गेला. रोजचा दिवस कसा जाईल ते आदल्या दिवशी माहीत नसते. खरे तर खूप काही फरक नसतो पण काही दिवस लक्षात राहण्यासारखे असतात. कधी कंटाळवाणे तर कधी खूप आनंदी तर कधी खूप मनस्ताप होतो , गोष्टी मनासारख्या होत नाहीत. आज ठरवले आहे आता रोज भात करून पिल्लांना खायला घालायचा. या निरागस पिल्लांना बघितल्यावर मला खूप आनंद होतो व छान मूड येऊन दिवस आनंदात जातो. कधी मित्रमैत्रिणींशी बोलून जातो. कधी खूप वेगळ्या आठवणींमध्ये जातो. गाणी डाऊनलोड करून घेण्यासाठी उमाने एक छान लिंक दिली तिला मनापासून धन्यवाद. तिच्यामुळेही माझा आजचा दिवस जास्त छान गेला.

2 comments:

  1. Anonymous12:39 PM

    Rohini Tai, Tumcha hey post vachun tumchya barobarach divas ghalavla asa vatla, itka chaan varnan karta tumhi, agdi dolya pudhe chitra ubharun yeta. :)

    Maala hi sabudanyachi khichadi khup mhanjey khupach avadte pan ithla sabudana me bhijavla tar chaan mokla nahi jhaala va khichadi pan chikat jhaali. Tumhi 'sabudana bhijavne' hya vishayavar ek post kara na, please!

    Badkanchya pillana bhaat khau ghatlyavar tumhaala vatnarya ananda madhye tumchya premal swabhavachi va niragaste chi jhalak milte...tumhi nehemi ashyach raha, maala tumhi khup avadta.

    ReplyDelete
  2. Thank you so much!!! :)

    ReplyDelete