दिवसामागुनी दिवस चालले ऋतुमागुनी ऋतू असे चक्र चालू असते. आत्याबाईंकडे सर्वांचे येणे जाणे अधुनमधून चालूच असते. संजलीचा विचार अमित डोक्यातून तात्पुरता काढून टाकतो. कॉलेजचे शेवटचे वर्ष असल्याने तो पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतो कारण की त्याला अतिशय उत्तम गुणांनी पदवीधर व्हायचे असते. चांगल्या पगाराची नोकरी नाहीतर मास्टर्स करायचे असते. संजलीचे वडील आपल्याला घरी बोलावत आहेत तर एकदा गेले पाहिजे आणि आपला संजलीशी लग्न करण्याचा विचारही त्यांना बोलून दाखवला पाहिजे पण ते कसे शक्य होईल तर नोकरी लागल्यावरच आणि त्या आधी संजलीच्या मनात काय आहे हे पण जाणून घ्यायला हवे. पण ही संजली मला एकटी भेटायला पाहिजे आणि तेही इतके सहजासहजी शक्य होईल असे वाटत नाही.
संजलीचे ज्युनिअर कॉलेज संपून ती मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असतो. तिला भाषेमध्ये खूप रस असतो त्यामुळे ती आर्टस ला गेलेली असते. नवीन कॉलेज नवीन मैत्रिणी त्यामुळे ती एका वेगळ्याच विश्वात असते. अभ्यासाबरोबर थोडे नटणे मुरडणे, सारखे आरशासमोर उभे राहणे, मैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये जाणे असे सर्व चालू असते. संजलीचे आईवडीलही तिच्या सगळ्या हौशी पुरवत असतात. आणि त्यांनी नाही तरी का म्हणायचे? एकुलती एक असते शिवाय हेच तर वय आहे हौसमौज करायचे. निरनिराळ्या फॅशनचे चुडीदार तर तिला खूप छान दिसतात. त्यावर मॅचिंग गळ्यातले कानातले सेटस घेणे पर्सेस हे सर्व तिच्या कपाटाच्या कप्यात तिने खूप आवडीने ठेवलेले असते. हौस करताना अभ्यासातले तिचे लक्ष जरा सुद्धा ढळलेले नसते.
आत्याबाईंच्या मुलाची बँकेतली नोकरी व्यवस्थित चालू असते. त्याला मित्रपरिवार खूप असल्याने कोणताही छोटा कार्यक्रम असला तरी ते सर्व मित्र मिळून जात असतात, मग ती एखादी सहल असो, एकत्र मिळून केलेले हॉटेलिंग असो नाहीतर कुणाचा लग्नसमारंभ असो. त्यात अमितही असायचा. त्यादिवशी दुपारी संजलीचे वडील काही कारणानिमित्ताने आत्याबाईंकडे आलेले असतात. जेवणे होऊन थोडी विश्रांतीही होते. तिचे वडील आत्याबाईंना म्हणतात मला आता निघायला पाहिजे. घर लांब आहे. "अरे जाशील रे. थोड्यावेळाने मी चहा टाकते तो घेऊन जा" आत्याबाई म्हणतात. आत्याबाईंचा चहा होतो. चहा पिताना त्यांच्या भावाजवळ त्यांच्या मुलाचा लग्नाचा विचार बोलून दाखवतात. आता मला अनिलचे लग्न करायला हवे. मुली बऱ्याच सांगून येत आहेत. घरात कशाला काही कमी नाही. त्याला बँकेत चांगली नोकरीही आहे मग कशाला लग्न लांबवायचे. पण हा मुलगा " मला आत्ता लग्न करायचे नाही"असे म्हणतो आहे. "अगं करील तो लग्न. सगळे मुले मुली लग्नाला आधी नको असेच म्हणतात" संजलीचे वडील म्हणतात. चहा पाणी आटोपल्यावर आत्याबाईंचा भाऊ जायला निघतो तेवढ्यात अमित व काही मित्र येतात. अनिल व सर्व मिळून त्यांच्या एका मैत्रिणीच्या लग्नाला जाणार असतात. लग्न दुसऱ्यादिवशी असले तरी अहेराकरता काय घ्यायचे, कोणत्या दुकानातून खरेदी करायची आणि त्यानिमित्ताने थोड्या गप्पा टप्पा व थोडी भटकंती असा कार्यक्रम असतो. परत एकदा "या की आमच्या घरी. आताच येताय का मी घरीच निघालो आहे" असे आत्याबाईंचा भाऊ अमितला म्हणतो.
नको आता नको परत कधीतरी. तुम्ही तुमचा सविस्तर पत्ता देऊन ठेवा मला. अमित त्याची छोटी डायरी पुढे करतो. त्यावर पत्ता लिहिल्यावर म्हणतो इथे राहता तुम्ही? मग हा एरिया तर मला चांगलाच माहीत आहे. इथे माझी मावसबहीण राहते. तिच्याकडे आलो की तुमच्याकडे नक्की येईन मी. हे सर्व संभाषण आत्याबाईंच्या कानावर पडते.
काही महिन्यानंतर असाच एक योगायोग जुळून येतो. अमित चांगल्या मार्कांनी पदवीधर होतो व त्याचे पेढे देण्याकरता तो त्याच्या मावसबहिणीच्या घरी येतो. तिथून थोड्या अंतरावर आत्याबाईंच्या भावाचे घर असते. त्याची बहीण नोकरी करत असते म्हणून तो रविवारी जातो. रविवारी सकाळी सकाळी लवकरच बाहेर पडतो. मावसबहिणीकडून निघून तो आत्याबाईंच्या भावाच्या घरी साधारण १० ते १०.३० च्या सुमारास येतो. घरावर टकटक करतो. संजलीचे वडिल दार उघडतात. "अरे तू होय! ये ये. बस. बरका हो अमित आलय." संजलीची आई बाहेर येते. अमित वडिलांच्या हातावर पेढ्याची पूडी ठेवतो आणि सांगतो मी पदवीधर झालो. नमस्कार करतो. " हो का? अरे वा वा! दोघेही त्याचे आदरातिथ्य छान करतात. संजलीची आई चहा घेऊन येते. चहा पिताना एकीकडे संजंली कुठे दिसते का? अशी नजर फिरवतो. कुठे गेली असेल संजली? असे मनातल्या मनात म्हणतो. एकीकडे चहा व टी. व्ही. चालू असतो. संजलीची आई म्हणते तुम्ही बोलत बसा. मी पोहे करत आणि संजलीला उठवते. आज रविवार ना त्यामुळे आमच्या बाईसाहेब जास्तीत जास्त किती झोपता येईल असे बघत असतात. यावर सर्व हसतात. अमित मनातल्या म्हणतो, "अरे बापरे! इतक्या उशीराने उठते ही! खूपच लाडावलेली दिसत्ये." असे म्हणून गालातल्या गालात हसतो.
आई संजलीला उठवायला जाते. अगं संजली उठे आता, जेवायची वेळ होत आली आणि उठल्या उठल्या पटकन बाहेर येऊ नकोस. ब्रश कर, चहा घे. अंघोळ करून जरा बऱ्यापैकी पंजाबी सूट घालून बाहेर ये. संजलीला अजूनही झोपायचे असते. "हो ना गं आई, उठते मी आणि बाहेर का नको येऊ?" संजली म्हणते. अगं अमित आला आहे. त्याच्यासमोर अवतारात नको येऊस. "मग आला तर आला तो काय मला नवीन आहे का? " असे म्हणून संजली जरा रागानेच उठते आणि आवरून बाहेरच्या खोलीत येते. बाहेर आल्यावर संजलीची आई पण सर्वांना पोहे घेऊन येते. हा घे पेढा. असे म्हणून संजलीचे वडील संजलीच्या हातावर पेढा ठेवतात आणि सांगतात की अमित चांगल्या मार्कांनी पदवीधर झाला आहे. पेढे घेऊन आला आहे आपल्या घरी. संजली त्याचे अभिनंदन करते. पोहे खात असताना संजलीची मैत्रिण येते व म्हणते " चल ना आज आपण तुळशीबागेत जाऊ, येशील माझ्याबरोबर? " संजली म्हणते "हो येईन की! मला तर तुळशीबागेत जायला खूप आवडते. मला पण परवा घेतलेल्या ड्रेसवर मॅचिंग दुपट्टा घ्यायचा आहे" संजलीच्या मैत्रिणीला आई पोहे देते व थोड्याच वेळात वेगळा ड्रेस घालून ती तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर पडते व अमितला बाय करते. नंतर थोड्यावेळात अमितही निघतो.
अमित घरी येतो पण त्याचा मूड काही ठीक नसतो. ही संजली म्हणजे ना! आपण सकाळी का गेलो तर संजली भेटेल म्हणून. त्यातून ही बया उशीराने उठलेली आणि नंतर मैत्रिणीबरोबर जायला एका पायावर तयार. मी आलोय त्याची जरासुद्धा दखल हिने घेतली नाही. कॉलेजचे वारे लागलेले दिसत आहे. अर्थात ती निघाली तेव्हा माझ्याकडे बघून बाय करून हासली मात्र खूप छान! हसल्यावर तर ही खूपच छान दिसते! मास्टर्स करून चांगली नोकरी लागली की नाहीतर त्याही आधी जर नोकरीची चांगली ऑफर आली की आपण रीतसर मागणीच घालू संजलीला याबद्दल शंका नाही.
क्रमश:
Khup ushira post keli. Mala vatale katha visarala
ReplyDeleteKhup ushira post keli. Mala vatale katha visarala
ReplyDeletevahit lihili hoti, pan 2-3 vela vachun mag nantar blog var lihili. visarle nahi :) katha prathamach lihit aahe tyamule vel lagat aahe. katha dokyat purNa aahe pan ti phulvayla vel lagto. sagle sandarbh kinva salagta kayam tikvave lagte na :) kasa vatla ha part kathecha? thanks for comment.
ReplyDeletehi rohini
ReplyDeletepls post remaining part asap...looking forward to it...
1st attempt ahe asa vaatat nahi ajibaat...you have a definite style in story telling...good work
Madhura
hii Madhura, tumcha abhipray vachun kharach khup chhan vatle. dokyaat aahe sarv story. ekek karun lavkarach lihin. barech parts hotil. agadi khup laamblachak nahiye. pan pudhcha part jast interesting aahe :) thanks again. mi aadhi vahit lihite aani vachun baghte mag edit karun blog var lihite. Thank you so much for your complements!
ReplyDeleteRohini Tai!!! Lavkaar pudhcha bhaag liha!! TV varchya serials peksha tumchi goshta jasta interesting ahe, kharach!
ReplyDeleteAta khup vaat baghayla lavu naka haan amhaala.
Abhiprayabaddal anek dhanyawaad!! pudhcha bhag ajun vahit lihila nahiye. lavkarach lihite. thanks a lottt :)
ReplyDelete