Friday, April 15, 2011
दिनांक १५ एप्रिल २०११
आजकाल उन्हाळा असल्याने पहाटे पहाटे जाग येते. कधी ५ ला तर कधी ६,७ ला. खिडकीतून बाहेर डोकावले तर अरुणोदय होत असतो. तसे मी पूर्वीचे काही अरुणोदयाचे फोटो घेतलेले आहेत. इथे समुद्रातून सूर्य वर येताना फोटोज घ्यायचे आहेत पण केव्हा मुहूर्त लागणार आहे कोण जाणे.
चैत्रगौरीपूजन व त्याबरोबर त्याचा नैवेद्य डाळ व पन्हे असे करायचे आज ठरवले होते. त्याप्रमाणे आदल्या रात्री हरबरा डाळ पण भिजत घातली होती पण काही केल्या आज मूड लागत नव्हता. आधी बाहेर तळ्यावर चक्कर मारून आले. तसे हल्ली माझी सकाळीच चक्कर असते. तिथे बाजूला एक गुलाबाचे झुडूप आहे त्यावरच्या गुलाबकळ्यांचे त्याचे फोटो घेतले. ४-५ पाकळ्या घेतल्या व काही शोभेची छोटो फुले घेतली. आल्यावर अंघोळ करून डाळ पन्हे करण्याच्या तयारीला लागले. पूजेची तयारी केली. तरी सुद्धा आज काही खास मूड नव्हता. पूजा केली व डाळ पन्हे याचा नैवेद्य दाखवला. मनासारखे सर्व झाले.
आज मनात दिवसभर पूर्वी आईकडे होणारे चैत्रगौरीचे हळदी कुंकू रेंगाळत राहिले. दुपारी बरेच फोटोज अपलोड करून डिलीट केले. संध्याकाळी पूर्वीच्या १-२ डायऱ्या चाळत बसले होते. त्यातून २-३ लेख होतील असे वाटते इतके लिहिले आहे. आज खरे तर रोजनिशी लिहिणार नव्हते. १२ वाजून गेले होते पण झोपण्यापूर्वी पटकन काहीतरी लिहू म्हणून लिहिले. आज का कोण जाणे अजिबात मूड चांगला नव्हता पण तरीही मनासारखी गौरीपूजा झाल्याचे समाधान आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
का गं असे म्हणत्येस...मुड का नाही तुझा आज..चल मस्तपैकी डाळपन्ह्याचा फोटो टाक पटकन..तुझा मुड नाही म्हणजे आम्च कस व्हायच गं???
thanks uma, mood nahi mhanje ase hote na kadhi kadhi tasech. kahi khas karan nahi. kahi velela vatate kahi karu naye nuste dhyanasta basave :)
Post a Comment